शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मुलीसह नांदेडचा आरोपी जेरबंद

By admin | Updated: December 21, 2015 03:19 IST

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खळबळ उडवून देणाऱ्या नांदेडच्या शेख सलिम शेख चांद (वय २५) याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपुरात अटक केली.

एटीएसची कारवाई : सुरेंद्रगड झोपडपट्टीत होता आरोपीनागपूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खळबळ उडवून देणाऱ्या नांदेडच्या शेख सलिम शेख चांद (वय २५) याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपुरात अटक केली. त्याच्यासोबतच मुलीलाही एटीएसने ताब्यात घेतले. नंतर या दोघांना नांदेड पोलिसांच्या हवाली करण्यात आले.शेख सलिम दोन वर्षांपूर्वी नागपुरात राहायचा. त्याने येथील एका तरुणीला नांदेडला पळवून नेले. तेथे त्याने तिच्याशी निकाह केला. त्यानंतर आता पुन्हा त्याने एका १७ वर्षीय मुलीला प्रेमजाळ्यात अडकवले आणि लग्नाचे आमिष दाखवून नांदेडमधून पळवून नेले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून राज्यातील विविध ठिकाणच्या पोलिसांना आरोपीची माहिती दिली. आरोपी सलिमचे लोकेशन नागपुरात मिळाल्याने एटीएसच्या स्थानिक पथकाने सलिम व अपहृत मुलीची शोधाशोध केली. तो गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेंद्रगड झोपडपट्टीत असल्याचे लक्षात आल्यानंतर सलिमचा रात्रभर शोध घेण्यात आला. रविवारी सकाळी त्याला ‘त्या’ मुलीसह एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याने ती मुलगी आपली पत्नी असल्याचे सांगितले. तीसुद्धा अपहरणाचा इन्कार करू लागली. आपण स्वमर्जीने सलिमसोबत आल्याचे ती सांगत होती. मात्र, ती अल्पवयीन असल्यामुळे आणि नांदेड ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असल्यामुळे एटीएसच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. नांदेड पोलिसांना ते मिळाल्याची माहिती देऊन नागपुरात बोलावून घेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी या दोघांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. मुलीसह सलिम ज्या ठिकाणी आढळला ती झोपडी नब्बू भाई नामक व्यक्तीची असून, सलिमने ५०० रुपये महिन्याने ती भाड्याने घेतली होती. तो येथे १५ डिसेंबरपासून राहत होता, असेही प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. (प्रतिनिधी)सलीमची पत्नीही गजाआडविशेष म्हणजे, या अपहरण प्रकरणात सलिमची पत्नी फातेमाही सहभागी आहे. गुन्हा दाखल होताच तीसुद्धा नांदेडमधून पळून गेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात पोलिसांना ती गवसली. शनिवारी गुजरात पोलिसांनीही फातेमाला ताब्यात घेतल्यानंतर नांदेड पोलिसांच्या हवाली केल्याचे वृत्त आहे.