डॉक्टरच्या चुकीमुळे शेजाऱ्यांनी केली अंत्यविधीची तयारी

By Admin | Updated: August 23, 2015 03:19 IST2015-08-23T03:19:18+5:302015-08-23T03:19:18+5:30

डॉक्टरने गंभीर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे व्हेंटिलेटर उद्या सकाळी काढून घेण्याची शक्यता वर्तविल्यामुळे या कर्मचाऱ्याच्या .....

Neighbors made preparations for funeral because of doctor's mistake | डॉक्टरच्या चुकीमुळे शेजाऱ्यांनी केली अंत्यविधीची तयारी

डॉक्टरच्या चुकीमुळे शेजाऱ्यांनी केली अंत्यविधीची तयारी

रेल्वे कर्मचारी जिवंत : खासगी रुग्णालयात घेत आहे उपचार
नागपूर : डॉक्टरने गंभीर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे व्हेंटिलेटर उद्या सकाळी काढून घेण्याची शक्यता वर्तविल्यामुळे या कर्मचाऱ्याच्या शेजाऱ्यांनी वृत्तपत्रात निधन वार्ता देऊन त्याच्या अंत्यसंस्काराची तयारीही केल्याची माहिती आहे. परंतु सुदैवाने अद्याप या कर्मचाऱ्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शशिकांत उपहारे (५१) हे अजनी रेल्वेस्थानकावर ट्रेन नंबर क्लर्क म्हणून कार्यरत आहेत. परवा गुरुवारी त्यांचा गंभीर अपघात झाला. त्यामुळे त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे शुक्रवारी दिवसभर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरने या रुग्णाच्या नातेवाईकांना त्याची प्रकृती गंभीर असून उद्या सकाळी त्यांचे व्हेंटिलेटर काढल्यानंतर ‘बॉडी’ घेऊन जा, असे सांगितले. त्यामुळे या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली. त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांचे सांत्वन केले. काही जणांनी सकाळी ‘बॉडी’ आणायची असल्यामुळे एका स्थानिक वृत्तपत्रात त्यांच्या निधनाची वार्तादेखील प्रसिद्ध केली.
दुसऱ्या दिवशी रेल्वेचे जवळपास १०० कर्मचारी रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची प्रकृती ठीक असून आपण ते मयत झाल्याचे घोषितच केले नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Neighbors made preparations for funeral because of doctor's mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.