शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

‘नीट’च्या पेपरचे नियोजन झाले नाही नीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 10:14 PM

एमबीबीएस व बीडीएस पदवी अभ्यासक्रम प्रवेशाकरिता गेल्या ६ मे रोजी घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेचे हुडकेश्वर येथील आदर्श संस्कार विद्यालयात योग्य संचालन करण्यात आले नाही. खोली क्र. ३९ मधील विद्यार्थ्यांना पेपर सोडविणे सुरू करण्याची परवानगी देण्यास किमान २० मिनिटे विलंब करण्यात आला असा चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केला.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांचा अहवालहायकोर्टाने सीबीएसईला मागितले स्पष्टीकरणं

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एमबीबीएस व बीडीएस पदवी अभ्यासक्रम प्रवेशाकरिता गेल्या ६ मे रोजी घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेचे हुडकेश्वर येथील आदर्श संस्कार विद्यालयात योग्य संचालन करण्यात आले नाही. खोली क्र. ३९ मधील विद्यार्थ्यांना पेपर सोडविणे सुरू करण्याची परवानगी देण्यास किमान २० मिनिटे विलंब करण्यात आला असा चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केला.न्यायालयाने गेल्या तारखेला प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी केली. त्यांनी परीक्षा अधिकारी व आठ विद्यार्थ्यांचे बयान नोंदवून परीक्षा संचालनात गडबड झाल्याचा अहवाल दिला. विद्यार्थ्यांना सकाळी १० वाजतापूर्वी ओएमआर शीट व प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आल्या होत्या. परंतु, विद्यार्थ्यांना पेपर सोडविणे सुरू करण्याची परवानगी देण्यास किमान २० मिनिटे विलंब झाला असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)ला यावर दोन दिवसांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. तसेच, चौकशी अहवाल रेकॉर्डवर घेतला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात वैष्णवी मणियार या विद्यार्थिनीने रिट याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा व अ‍ॅड. रोहण चांदुरकर, आदर्श विद्यालयातर्फे अ‍ॅड. अनिल किलोर तर, सीबीएसईतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सी. एस. कप्तान व पृथ्वीराज चव्हाण यांनी कामकाज पाहिले.असे आहे प्रकरणयाचिकेतील माहितीनुसार, ‘नीट’ परीक्षा तीन तासांची होती. त्यासाठी सकाळी १० ते १ वाजताची वेळ देण्यात आली होती. याचिकाकर्तीचा रोल नंबर खोली क्र. ३९ मध्ये होता. तेथील विद्यार्थ्यांना सीलबंद लिफाफ्यामध्ये प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. दरम्यान, समवेक्षकाने पुढील सूचनेशिवाय लिफाफा उघडू नये, अशी सूचना केली. त्यामुळे कुणीच लिफाफा उघडला नाही. सकाळी १०.३० वाजता वरिष्ठ समवेक्षक आल्यानंतर त्यांनी ताबडतोब लिफाफा उघडून पेपर सोडवायला सुरुवात करण्यास सांगितले. त्यावेळी विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी दुपारी १.३० वाजतापर्यंत वेळ मिळेल असे वाटले होते. परंतु, त्यांचे पेपर अगदी वेळेवर, म्हणजे, दुपारी १ वाजताच परत घेण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले. त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही काहीच फायदा झाला नाही.

 

टॅग्स :NEET Result 2018नीट परीक्षा निकाल २०१८High Courtउच्च न्यायालय