शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसह व्यवस्था परिवर्तनाची गरज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:47 IST

संविधान हे देशातील सर्व धर्म, पंथ व लोकांना एकसंध ठेवण्याचे काम करते. त्यामुळे या संविधानाच्या रक्षणाचे कार्य सरकारचे आहे. परंतु गेल्या चार वर्षात सरकार ते करीत नसल्याचे दिसून येते. उलट संविधान न मानणाऱ्यांनापाठीशी घालण्याचे कार्य सरकारकडून होताना दिसून येते. त्यामुळे संविधानाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसोबतच व्यवस्था परिवर्तनाचीही गरज असून हे परिवर्तन जनआंदोलनाच्याच माध्यमातून होईल, असा विश्वास जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे डॉ. सुनीलम यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देसुनीलम् : संविधान सन्मान यात्रा नागपुरात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधान हे देशातील सर्व धर्म, पंथ व लोकांना एकसंध ठेवण्याचे काम करते. त्यामुळे या संविधानाच्या रक्षणाचे कार्य सरकारचे आहे. परंतु गेल्या चार वर्षात सरकार ते करीत नसल्याचे दिसून येते. उलट संविधान न मानणाऱ्यांनापाठीशी घालण्याचे कार्य सरकारकडून होताना दिसून येते. त्यामुळे संविधानाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसोबतच व्यवस्था परिवर्तनाचीही गरज असून हे परिवर्तन जनआंदोलनाच्याच माध्यमातून होईल, असा विश्वास जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे डॉ. सुनीलम यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.देशभरातील ३५० जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे गेल्या २ आॅक्टोबर रोजी दांडी (गुजरात) येथून संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. १० डिसेंबर रोजी दिल्ली येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. गुजरात, मध्यप्रदेश मार्गे ही यात्रा शुक्रवारी नागपुरात दाखल झाली. यावेळी यात्रेत सहभागी झालेले मध्य प्रदेशातील किसान संघाचे डॉ. सुनीलम, प्रफुल्ल सामंतारा (भुवनेश्वर), सुनीती सु.र.(पुणे), आराधना भार्गव, दीपक चौधरी, गुजरात येथील बुलेट ट्रेन विरोधी आंदोलनाचे कृष्णकांत आणि उत्तराखंड येथे पर्यावरण बचाव आंदोलनातील कार्यकर्ते विमलभाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उर्वेला कॉलनी येथे परिषद पार पडली. या परिषदेतही संविधानाच्या संरक्षणासाठी सत्तेसह व्यवस्था परिवर्तनाचे आवाहन करण्यात आले. यावेळी संविधान यात्रेत सहभागी असलेल्या नेत्यांसह माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, प्रा. देवीदास घोडेस्वार, पी.एस. खोब्रागडे, पुंडलिक तिजारे, संजय शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी किशोर पोतनवार यांच्या संविधान पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविक विलास भोंगाडे यांनी केले. संचालन त्रिलोक हजारे यांनी केले. जगजितसिंग यांनी स्वागत केले. नरेश वाहाणे यांनी आभार मानले.सरकार कॉर्पोरेटचे गुलामसध्याचे सरकार हे कॉर्पोरेटचे गुलाम झाले आहेत.अदानी-अंबानींच्या हितासाठीच विकासाची धोरणे राबवली जात आहेत, त्यामुळे सरकारची विकास नितीच चुकीची आहे. तेव्हा हे सरकार सत्तेतून उखडून फेकणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे प्रफुल्ल सामंतारा यांनी सांगितले. तर सध्या देशात समाजा-समाजामध्ये, जाती-धर्मामध्ये वैमनस्य पसरवले जात आहे, आणि ते पसरवणा ऱ्यांना सरकारचा छुपा पाठिंबा आहे, असा आरोप सुनीती यांनी केला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरnagpurनागपूर