शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा प्रचार-प्रसार ही काळाची गरज
By Admin | Updated: July 7, 2014 01:02 IST2014-07-07T01:02:49+5:302014-07-07T01:02:49+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची गरज पूर्वीच ओळखली होती. त्यांनी देश स्वतंत्र होण्यापूर्वीच पत्नी रमाबार्इंना शिक्षित करून त्यांच्याकडून विद्यादानाचे महत्कार्य करून घेतले. विशेषत्वाने

शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा प्रचार-प्रसार ही काळाची गरज
न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन : अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे वकील परिषदेचे आयोजन
श्यामकांत पाण्डेय - धारणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची गरज पूर्वीच ओळखली होती. त्यांनी देश स्वतंत्र होण्यापूर्वीच पत्नी रमाबार्इंना शिक्षित करून त्यांच्याकडून विद्यादानाचे महत्कार्य करून घेतले. विशेषत्वाने मागासवर्गीय महिलांना घरीच शिक्षण मिळावे, यावर त्यांचा भर होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संविधान तयार करताना मूलभूत गरजांमध्ये शिक्षणाचा समावेश करण्यात आला. म्हणूनच शिक्षणाचे महत्त्व ओळखून शिक्षणाच्या या मूलभूूत अधिकाराचा प्रचार व प्रसार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.
कुसुमकोट बुजुर्ग येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे वाहीद शेख मेमोरियल इंटरनॅशनल लॉ कॉलेजमध्ये ‘शिक्षणाचा मूलभूत अधिकार’ या विषयावर आयोजित परिषदेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सेंटीनेल सॉलिसिटर्स, लंडन, वकील संघ धारणी आणि शेख अँड को सॉलीसीटर्स लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने धारणी येथे रविवारी ही परिषद पार पडली. परिषदेला न्यायमूर्ती भूूषण गवई, न्यायमूर्ती पी.जी. वराळे आणि न्यायमूर्ती झेड. ए. हक, बार काऊन्सील आॅफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष जयंत जयभाने, उपाध्यक्ष अनिल गोवरदिवे, अमरावती येथील गणेश सारडा, सॉलीसिटर आॅफ सुप्रीम कोर्ट आॅफ लंडनचे साजीद शेख उपस्थित होते.
मेळघाटसारख्या दुर्गम आदिवासी भागात पहिले सेमिनार आयोजित केल्याबद्दल जयंत जयभाने यांनी आयोजकांचे कौतुक केले. शिक्षणाची खरी गरज अशाच दुर्गम व आदिवासी भागाला सर्वात जास्त आहे. कार्यक्रमात उपस्थित सर्व नामवंत वकिलांनी शिक्षण विषयक कायद्याची माहिती आपल्या वकिलांना करून द्यावी, असे जायभाने यांनी यावेळी सांगितले. न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणात अल्पसंख्यक समुदायाचाही सिंहाचा वाटा असावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या धारणी येथील उर्दू महाविद्यालयाला त्यांनी शुुभेच्छा दिल्यात.
तत्पूर्वी या शैक्षणिक परिषदेच्या आयोजनाची पार्श्वभूमी विशद करताना लंडन येथील सॉलिसिटर साजीद शेख यांना गहिवरून आले. कार्यक्रमाला न्यायमूर्र्ती पी.बी. वराळे, वकील अनिल गोवरदिवे आणि सतीश सारडा यांनीही मार्गदर्शन केले. संचालन अॅड. सत्यदेव गुप्ता यांनी केले.