शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

संविधान बदलण्याची मानसिकता ठेचण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:15 IST

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात हिंसक जमावाने केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. अफवेमुळे या पाच जणांना मारण्यात आले. काही जण लोकांची डोकी भडकवण्याचे काम करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसले, पण त्याच पक्षाचे लोक संविधान बदलायला निघाले आहेत. ही मानसिकता ठेचून काढण्याची गरज आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

ठळक मुद्देधनंजय मुंडे यांचा राईनपाडा घटनेवरून सरकारवर हल्लाबोलसोशल मीडियाच्या अतिरेकाला आळा घालणारा कायदा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात हिंसक जमावाने केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. अफवेमुळे या पाच जणांना मारण्यात आले. काही जण लोकांची डोकी भडकवण्याचे काम करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसले, पण त्याच पक्षाचे लोक संविधान बदलायला निघाले आहेत. ही मानसिकता ठेचून काढण्याची गरज आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून कपिल पाटील यांनी राईनपाडा येथील नाथपंथी डवरी समाजातील पाच जणांना मारहाण करून त्यांची हत्या केल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. धनंजय मुंडे यांनी हा विषय लावून धरला. ते म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी आणि प्रगतशील महाराष्ट्रासाठी राईनपाडाची घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. समाजातील गरीब, दुर्बल, वंचित आणि उपेक्षित घटकातील या पाच जणांची इतक्या अमानुषपणे हत्या होते; परंतु समाजातून दबका आवाज वगळता निषेधाचा तीव्र सूर उमटत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.अफवेच्या गैरसमजातून पाच जणांना ठेचून मारले जाते. पाच निरपराधांना कोंडून त्यांची ठेचून हत्या जमाव करतो. या जमावाला कायद्याची भीती का वाटत नाही. अशी हत्या करण्यास समाज का प्रवृत होतो. या झुंडशाहीमागचा मास्टमार्इंड, यामागची विचारसरणी शोधावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. राईनपाडा प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या नियंत्रणात एसआयटी गठित करून या खटल्याची सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्यात यावी. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत व कुटुंबातील व्यक्तीस नोकरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.आंबा खाल्ल्याने पुत्र प्राती होते. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षा मनू मोठा आहे. अशा मानसिकतेचे राईनपाडा येथील बळी आहेत. भटक्या जमातीची जात गणना करून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. या समाजातील लोकांना पोलिसांनी ओळखपत्र द्यावे, अशी मागणी कपिल पटील यांनी केली.अफवांमुळे वेगवेगळ्या घटनात २२ जणांचे बळी गेले आहे. अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी टास्क फोर्स गठित करण्यात यावे. अफवांना आळा घालण्यासाठी व्हॉटस्अ‍ॅपवरील चुकीच्या मेसेजला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नीलम गोºहे यांनी केली. रामहरी नूपवर म्ह्णाले, पुरोगामी राज्यात अफवांवर विश्वास ठेवणारा समाज आहे. याचे आत्मचिंतन होण्याची गरज आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा सवालही त्यांनी केला.काँग्रेसचा एकही अध्यक्ष तडीपार नव्हताअल्पकालीन चर्चेत भाई गिरकर यांनी विरोधकांवर टीका करताना काँग्रेसचा अध्यक्ष संविधानानुसार निवडला जात नसल्याचे म्हटले. याचा भाई जगताप यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, आजवर काँग्रेसचे ७२ अध्यक्ष झाले. यात फक्त चार गांधी होते. काँग्रेसचा एकही अध्यक्ष तडीपार नव्हता, असा अप्रत्यक्ष हल्लाबोल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर केला. यावरून सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता.मुंडे-गोऱ्हे यांच्यात चकमकया अल्पकालीन चर्चेदरम्यान उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दुसऱ्या क्रमाकांवर शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांचे नाव पुकारले. त्यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चर्चेत त्यांचे नाव दुसऱ्या क्रमाकांवर असल्याने त्यांना बोलू द्यावे, अशी मागणी केली. त्यावरून सभागृहाचे कामकाज नेमके कोणत्या नियमानुसार चालावे, यावर खल झाला. यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मला बोलू द्यायचे नाही का? यावर मुंडे म्हणाले, सदनाच्या दोन सदस्यांत अशाप्रकारे गैरसमज होत असेल तर कामकाजाला अर्थ राहत नाही. तार्इंना मी कशाला थांबवू, त्यानंतर उपसभापतींनी मुंडे यांना बोलण्यास सांगितले.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Dhananjay Mundeधनंजय मुंडे