अपंगांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज

By Admin | Updated: August 26, 2014 01:03 IST2014-08-26T01:03:47+5:302014-08-26T01:03:47+5:30

समाजातील अपंग व्यक्तींकडे दुर्लक्ष केले जाते. प्रसंगी त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही. व्यक्ती अपंग असली तरी ती समाजाचा एक घटक आहे. या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे,

The need to bring the disabled to the mainstream | अपंगांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज

अपंगांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज

अनिल देशमुख : कृत्रिम अवयव व साहित्य वाटप कार्यक्रम
काटोल : समाजातील अपंग व्यक्तींकडे दुर्लक्ष केले जाते. प्रसंगी त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही. व्यक्ती अपंग असली तरी ती समाजाचा एक घटक आहे. या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी केले.
वसंतराव देशमुख देशमुख प्रतिष्ठान, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर व नागपूर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने काटोल येथे कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी देशमुख यांच्या हस्ते काटोल विधानसभा मतदारसंघातील अपंगांना कृत्रिम अवयव व साधानांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, शासनाच्यावतीने अपंगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. मंत्रिपदाच्या कार्यकाळात आपण काटोल विधानसभा मतदारसंघातील गरजूंपर्यंत शासकीय व निमशासकीय योजना पोहोचविल्या आहेत. या योजनांचा वेळीच लाभ मिळाल्याने अनेक गरजवंतांना मोठी मदत झाली आहे. या योजनांचा लाभ मिळाल्यानंतर अनेकांचे जीवन सुखकर झाले आहे. आज या मतदारसंघातील शेकडो गरजू अपंगांचे जीवन सुखकर होणार आहे. त्यांना मोफत कृत्रिम अवयवांचे व साहित्याचे वाटप आपल्या हस्ते होत असल्याने हा आपल्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.
या योजनेंतर्गत नरखेड व काटोल तालुक्यातील सर्व प्रवर्गातील व वयोगटातील अपंग व्यक्तींचा शोध घेण्यात आला. ८ फेबु्रवारी २०१४ रोजी नरखेड व १० फेब्रुवारी २०१४ रोजी काटोल येथे शिबिराचे आयोजन करून या अपंगांच्या अवयवाचे मोजमाप घेण्यात आले. या मोजमाप शिबिरात नरखेड व काटोल तालुक्यातील अस्थिव्यंग, मतिमंद, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग, कर्णबधिर, अंशत: अंध, अंध या प्रवर्गातील एकूण ९५३ अपंग व्यक्तींचे त्यांच्या गरजेनुसार आवश्यक असणारे कृत्रिम अवयव व साहित्य व साधने यांचे मोजमाप घेण्यात आले होते. या सर्व व्यक्तींना कृत्रिमम अवयव व साहित्याचे नुकतेच वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The need to bring the disabled to the mainstream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.