शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

‘नीट’चा महाघोटाळा; ‘सेटिंगबाज’ परिमलची देशातील विविध शहरात ‘लिंक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 06:45 IST

Nagpur News लाखो रुपयांच्या मोबदल्यात नीट परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी डमी उमेदवार उभे करण्याच्या देशपातळीवरील रॅकेटचे धागेदोरे नागपुरात सापडल्याने ‘कोचिंग क्लास’ जगताला हादरा बसला आहे.

ठळक मुद्देमहाघोटाळ्याचा सूत्रधार वैद्यकीय प्रवेशाच्या ‘रॅकेट’मध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय२०१५ मध्ये ‘हायटेक कॉपी’ प्रकरणात झाली होती अटक

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लाखो रुपयांच्या मोबदल्यात नीट परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी डमी उमेदवार उभे करण्याच्या देशपातळीवरील रॅकेटचे धागेदोरे नागपुरात सापडल्याने ‘कोचिंग क्लास’ जगताला हादरा बसला आहे. आर. के. एज्युकेशनचा संचालक परिमल कोतपल्लीवार याची नवी दिल्लीसह देशातील विविध शहरांत ‘लिंक’ होती. पालकांना जाळ्यात ओढण्यासाठी विविध ठिकाणी ‘एजंट्स’देखील नेमले होते. विशेष म्हणजे परिमल हा वैद्यकीय प्रवेशाच्या ‘रॅकेट’मध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय होता व त्याला २०१५ मध्ये अटकदेखील झाली होती, अशी माहिती सूत्रांनी लोकमतला दिली आहे. (‘Neat’ scam; 'Settings' Parimal's 'links' to various cities across the country)

आर.के.एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून परिमल व त्याचे एजंट्स देशातील विविध शहरांतील पालकांशी संपर्क करायचे. मोठमोठ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचे आमिष देऊन ते त्यांना जाळ्यात ओढायचे. परीक्षेसाठी ‘डमी’ उमेदवारदेखील देशातील वेगवेगळ्या भागातून तयार केले जायचे. या संस्थेचे एक कार्यालय नवी दिल्ली येथील नेहरू पॅलेस मेट्रो स्थानकाजवळ होते. विशेष म्हणजे पालकांकडून विद्यार्थ्यांचा ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ घेऊन ‘डमी’ उमेदवारांच्या सोयीच्या शहरातच परीक्षा केंद्राचा पर्याय दिला जायचा.

‘सेटिंग’मधून अनेकांचे प्रवेश

‘नीट’चा हा महाघोटाळा केवळ याच वर्षीचा नसून मागील काही वर्षांपासून परिमल या कामात होता. आर.के.एज्युकेशनच्या माध्यमातून २०२० सालच्या ‘नीट’मध्येदेखील याच पद्धतीने पालकांना संपर्क करण्यात आला होता. परीक्षा देण्यापासून ते प्रवेश करून देण्यापर्यंतच्या पूर्ण ‘सेटिंग’चा या ‘रॅकेट’मध्ये समावेश होता. त्यामुळे अशा पद्धतीने परीक्षा देऊन देशात नेमक्या किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे याची चाचपणीदेखील सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

सहा वर्षांअगोदर ‘हायटेक कॉपी’मध्येदेखील होता सहभागी

या ‘रॅकेट’चा सूत्रधार परिमल कोतपल्लीवार हा मूळचा नागपूरचाच असून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकारांमध्ये तो अनेक वर्षांपासून लिप्त आहे. २०१५ साली ‘एआयपीएमटी’ परीक्षेत अत्याधुनिक ‘गॅजेट्स’चा वापर करून ‘कॉपी’ करण्याच्या प्रकाराने देशभरातील शिक्षण वर्तुळाला हादरा बसला होता. त्या ‘रॅकेट’मध्येदेखील परिमल सहभागी होता. विद्यार्थी ‘मायक्रो स्पीकर्स’ ‘नॅनो इअर फोन्स’, ‘आयवॉच स्कॅनर’ इत्यादींच्या माध्यमातून विद्यार्थी बाहेर प्रश्न पाठवत होते व हरयाणाच्या बहरोद येथून त्यांना उत्तरे सांगण्यात येत होती. परिमलने तेव्हा प्रतिविद्यार्थी १७ लाख रुपयांच्या ‘डील’वर शहरातीलच सात विद्यार्थ्यांशी ‘डील’ केली होती. ग्रेट नाग रोडवर त्याने याच कामासाठी कार्यालयदेखील स्थापन केले होते. हरयाणा पोलिसांच्या ‘एसआयटी’ने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली होती व तत्कालीन डीएसपी अमित भाटिया यांच्या नेतृत्वातील चमूने परिमलला ६ मे २०१५ रोजी अटक केली होती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र