नीटच्या रॅकेटचे धागेदोरे नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:11 AM2021-09-23T04:11:13+5:302021-09-23T04:11:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - लाखो रुपयांच्या मोबदल्यात नीट परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी डमी उमेदवार उभे करण्याच्या देशपातळीवरील रॅकेटचा ...

Neat racket threads in Nagpur | नीटच्या रॅकेटचे धागेदोरे नागपुरात

नीटच्या रॅकेटचे धागेदोरे नागपुरात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - लाखो रुपयांच्या मोबदल्यात नीट परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी डमी उमेदवार उभे करण्याच्या देशपातळीवरील रॅकेटचा सीबीआयने भंडाफोड केला आहे. या रॅकेटचे धागेदोरे थेट नागपुरात सापडले असून, शहरातील आर. के. एज्युकेशन या खासगी संस्थेमार्फत हा गोलमाल सुरू होता. या रॅकेटचा सूत्रधार परिमल कोतपल्लीवार याच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपुरातील आर. के. एज्युकेशन करिअर गायडन्स या संस्थेमार्फत हा सर्व प्रकार सुरू होता. सीबीआयने यासंदर्भात काही दिवसांअगोदर छापेदेखील टाकले होते. यानंतर कोतपल्लीवार व त्याच्या सहकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात आली होती. कोतपल्लीवारने दिलेल्या माहितीनंतर हा धक्कादायक खुलासा झाला. वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या श्रीमंत विद्यार्थ्यांना हेरले जायचे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश होईल व त्याबदल्यात ५० लाख रुपये द्यावे लागतील, अशी डील व्हायची. संबंधित विद्यार्थ्याच्या बदल्यात डमी उमेदवार परीक्षा द्यायचा. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पालकांनी जमा केली कागदपत्रे

सीबीआयने केलेल्या चौकशीत पालकांनी कोतपल्लीवारकडे पोस्टडेटेड धनादेश तसेच विद्यार्थ्यांची दहावी-बारावीची मूळ गुणपत्रिकादेखील जमा केल्याचे आढळून आले. ५० लाख रुपये भरल्यावर मूळ कागदपत्रे परत करण्यात येणार होते. पालकांनी विद्यार्थ्यांचे युझर आयडी व पासवर्डदेखील दिले होते. प्रवेशपत्रावर डमी उमेदवार ओळखू येऊ नये यासाठी छायाचित्राचे मॉर्फिंगदेखील करण्यात येत होते. शिवाय ई-आधारच्या माध्यमातून बोगस ओळखपत्रदेखील तयार करण्यात आली होती.

इतर कोचिंग क्लासेसवरदेखील होता संशय

नीट परीक्षेतील सीबीआयने नागपुरातील पाच कोचिंग क्लासेसवर काही दिवसांअगोदर छापे टाकले होते. यात काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. इतर कोचिंग क्लासेसदेखील सीबीआयच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Neat racket threads in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.