शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठिंबा काँग्रेसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 7:39 PM

विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना रोखण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेने कंबर कसली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपले पत्ते उघड केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा काँग्रेसच्या उमेदवारालाच असेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देसुनील तटकरे यांची स्पष्टोक्ती

आॅनलाईन लोकमतनागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना रोखण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेने कंबर कसली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपले पत्ते उघड केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा काँग्रेसच्या उमेदवारालाच असेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर १२ डिसेंबर रोजी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संयुक्त हल्लाबोल-जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी तटकरे शुक्रवारी नागपुरात आले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत गेल्यावेळी तीन जागांसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. त्यावेळी दोन जागा राष्ट्रवादीला तर नारायण राणे यांची एक जागा काँग्रेसला देण्यात आली होती. आता राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिकामी झालेली ही जागा काँग्रेसच्या कोट्यातील आहे. काँग्रेस देईल त्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.मी लाभार्थीच्या जाहिराती फसव्या सरकारने राज्याचा कुठलाही विकास केला नाही. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून ‘मी लाभार्थी’च्या जाहिराती केल्या जात आहेत. या सर्व जाहिराती फसव्या व दिशाभूल करणाऱ्या  आहेत. या जाहिरातींवर केलेल्या खर्चात धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देता आला असता, अशी टीका तटकरे यांनी केली.मोर्चा एकत्र, शरद पवार सहभागी होणारअधिवेशनावर राष्ट्रवादीतर्फे ११ डिसेंबर रोजी तर काँग्रेसतर्फे १३ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, समविचारी पक्षांनी एकत्र येत संपूर्ण ताकदीने सरकार विरोधात मोर्चा काढावा, असा विचार मांडला गेला. दोन्ही मोर्चे एकत्र करण्याची विनंती काँग्रेसने केली. ती राष्ट्रवादीने मान्य केली. त्यामुळे आता १२ डिसेंबर रोजी एकच मोर्चा निघणार असून त्यात शेकाप, पीरिपा, समाजवादी पक्ष देखील सहभागी होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १२ डिसेंबर रोजी ७८ व्या वर्षात पर्दापण करीत आहेत. या वेळी ते शेतकऱ्यांसाठी काढलेल्या मोर्चात सहभागी होऊन आपला वाढदिवस साजरा करणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारण