राष्ट्रवादीने लावले खड्ड्यांचे चित्र प्रदर्शन

By Admin | Updated: August 22, 2016 02:53 IST2016-08-22T02:53:26+5:302016-08-22T02:53:26+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो काढून त्याचे चित्र प्रदर्शन लावले आहे.

NCP's picture shows of potholes | राष्ट्रवादीने लावले खड्ड्यांचे चित्र प्रदर्शन

राष्ट्रवादीने लावले खड्ड्यांचे चित्र प्रदर्शन

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो काढून त्याचे चित्र प्रदर्शन लावले आहे. जाधव चौक, एसटी बस स्टॅण्ड येथे लावलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने महापालिकेत सत्तेत असलेला भाजप नागपूरकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यातही अपयशी ठरत असल्याची टीका केली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सलील देशमुख यांच्या नेतृत्वात हे अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. नागरिकांना या रस्त्यांवरून वाहने चालविणे कठीण झाले आहे. दररोज अपघात होत आहेत. गेल्या १० वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, त्यानंतरही रस्त्यांवरील खड्डे भरण्यात आलेले नाही. नागरिकांकडून खड्ड्यांबाबत ओरड झाली असता महापालिकेने एक समिती नेमून चौकशीचा फार्स केला व रस्त्यांवर खड्डे नसल्याचा अहवाल दिला, असा आरोप सलील देशमुख यांनी यावेळी केला.
भाजपच्या या निष्क्रियतेविरोधात पुढील काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी महापालिकेतील माजी गटनेते वेदप्रकाश आर्य, कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे, विशाल खांडेकर, अनिल अहीरकर, नूतन रेवतकर, मदुकर भावसार, रोशन भिमटे, राजीव धुमेजा, इमरान चिस्ती, विनोद हेडाऊ, स्वप्नील सूर्यवंशी, अमित करवाडे, सोहेल मिर्झा, अनिकेत गाायकवाड, विद्या सेलूकर श्रद्धा शाहू, इंदिरा मल्लिक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's picture shows of potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.