शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

एसएनडीएल विरोधात राष्ट्रवादीचा एल्गार

By admin | Updated: July 29, 2016 02:56 IST

महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यातच नागपूर शहराला वीज पुरवठा करणाऱ्या एसएनडीएलच्या भोंगळ कारभारामुळे ...

संविधान चौकात बिलाची होळी : कार्यक र्त्यांना अटक नागपूर : महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यातच नागपूर शहराला वीज पुरवठा करणाऱ्या एसएनडीएलच्या भोंगळ कारभारामुळे प्रचंड प्रमाणात वीज बिल वाढले आहे. वाढीव बिल कमी करून या कंपनीच्या विरोधात राज्य सरकारने कारवाई करावी. यासाठी माजीमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गुरुवारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त नागरिकांनी वाढीव बिलाची होळी करून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ प्रमुख सलील देशमुख यांच्यासह कार्यक र्त्यांना पोलिसांनी अटक केली. नंतर अनिल देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त अनुपकुमार यांना निवेदन देऊ न एसएनडीएलच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. कंपनीने पुढील तीन वर्षात ३० ते २०० टक्के वीज दरवाढ प्रस्तावित केली आहे. वीज बिलाची आकारणी करण्यासाठी एसएनडीएलने लावलेले वेगवेगळ्या पाच कंपन्यांचे मीटर सदोष आहेत. झोपडपट्टीधारकांना दोन-दोन हजारांचे बिल येत आहे. यापूर्वी राज्यात आघाडीचे सरकार असताना सदोष मीटर अहमदाबादला तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. त्यात दोष आढळल्यास ग्राहकांना भरपाई दिली जात होती. परंतु भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर ही प्रक्रिया बंद झाली आहे. एसएनडीएलकडे तक्रार आल्यास ते महावितरणकडे जबाबदारी असल्याचे सांगतात तर महावितरण एसएनडीएलकडे बोट दाखविते. यामुळे ग्राहकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. भाजपने लोकांना दिलेल्या आश्वसनाची पूर्तता करून एसएनडीएलला हद्दपार करावे. अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. आंदोलनात माजी आमदार दीनानाथ पडोळे, मनपातील माजी गटनेते वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर, नगरेवक दुनेश्वर पेठे, राजू नागुलवार, ईश्वर बाळबुधे, दिलीप पनकुले, पुरुषोत्तम वाडीघरे, नुतन रेवतकर, रेखा कृपाले, जावेद हबीब, महेंद्र भांगे, नरेंद्र पुरी, विनोद हेडाऊ, रमन ठवकर, सुखदेव वंजारी, गिरीष ग्वालबंशी, सुरेश बारापात्रे, आय.के.पाशा, अनिल खडगी, कादीर शेख,अशोक अडीकने, दिनेश त्रिवेदी, जावेद खान, शैलेंद्र तिवारी, दिनकर वानखेडे, इखरा खान, अलका कांबळे, जानबा मस्के, स्वनील खापेकर, राजेंद्र बढीये, विद्या सेलुकर, प्रशांत बनकर, राजेश आत्राम, गोपाल ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)