शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा! मुंबईत प्रदेशाध्यक्षांसमोर पदाधिकाऱ्यांनी मांडले समीकरण

By कमलेश वानखेडे | Updated: June 14, 2023 19:12 IST

काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही रामटेक लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे.

नागपूर : काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनेहीरामटेक लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. रामटेकची जागा शिवसेनेने जिंकली होती. मात्र, आता खा. कृपाल तुमाने व आ. आशीष जयस्वाल दोघेही शिंदे गटात सहभागी झाले आहे. शिवसेना विभागल्यामुळे कमजोर झाली आहे. राष्ट्रवादी जिल्ह्यात दोन विधानसभा मतदारसंघात लढते. त्यामुळे रामटेक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्याकडे केली. 

वर्धा, अमरावती, गडचिरोली व नागपूर या चार लोकसभा मतदारसंघांची स्थिती जाणून घेण्यासाठी बुधवारी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मुंबईत बैठक बोलाविली होती. या बैठकीला विरोधी पक्ष नेते अजित पवार, छगन भुजबळ, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील हे प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीत जिल्हाध्यक्ष बाब गुजर यांनी काँग्रेसला जिल्ह्यात विधानसभेच्या सहापैकी चार दिल्या जातात. त्यामुळे लोकसभेची जागा राष्ट्रवादीने मागावी, अशी मागणी केली. काँग्रेस लढत असलेल्या चार विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीची बऱ्यापैकी ताकद आहे. जिल्ह्यात तिसऱ्या क्रमाकांवर असलेल्या शिवसेनेला (ठाकरे गट) लोकसभेची उमेदवारी देणे योग्य होणार नाही, अशीही बाजू गुजर यांनी मांडली. बैठकीत माजी आ. प्रकाश गजभिये, राजाभाऊ ताकसांडे व रमेश फुले यांनी पक्षाने उमेदवारी दिली तर आपली ताकदीने निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे सांगितले. बैठकीला कार्याध्यक्ष विलास झोडापे, सलील देशमुख, लीलाधर धनविजय, राजाभाऊ आखरे, संतोष नरवडे, अनुप खराडे, बंडोपंत उमरकर, अनिल साठवणे, विलास कांबळे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेतही डावलले जातेविधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये राष्ट्रवादीला काटोल व हिंगणा हे दोनच मतदारसंघ दिले जातात. काँग्रेस उर्विरत चार मतदारसंघात लढते. याचे परिणाम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भोगावे लागतात. या निवडणुकीतही आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा येतात. असेच सुरू राहिले तर जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढणार कशी, अशी नाराजीही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसramtek-acरामटेकlok sabhaलोकसभा