दाेन्ही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी, भाजपचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST2021-01-19T04:10:16+5:302021-01-19T04:10:16+5:30
साैरभ ढाेरे लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : तालुक्यातील खंडाळा, भाेरगड व माळेगाव या तीन ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले असून, ...

दाेन्ही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी, भाजपचा दावा
साैरभ ढाेरे
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : तालुक्यातील खंडाळा, भाेरगड व माळेगाव या तीन ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले असून, यातील खंडाळा व भाेरगड ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने दावा केला आहे. माळेगाव ग्रामपंचायतवर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित गटाने बाजी मारली आहे.
खंडाळा येथे परिवर्तन पॅनलचे रोशन खरपुरिया, कुसुम गजाम, नारायण शेंडे, योगिता गजाम, अरुण उईके, निरंजन कुमेरिया, अर्चना सयाम यांनी बाजी मारली असून, त्यांनी ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला आहे. भोरगड येथे परिवर्तन पॅनलच्या रोशनी पातोडे, विजय परतेती, हेमेंद्र चरडे, रेखा सयाम, वच्छला ढोबळे, राधा रेवतकर, राहुल पाटील विजयी झाले असून, त्यांनी एकता पॅनलच्या सातही उमेदवारांना पराभूत केले आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने दावा केला आहे.
माळेगाव येथे नऊपैकी पाच जागांवर राष्ट्रवादी समर्थित समता पॅनलच्या तर चार जागांवर शेतकरी कामगार पक्ष समर्थित गटाच्या उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. विजयी उमेदवारांमध्ये समता पॅनलच्या वनिता उईके, जया वानखडे, वसंता वर्धे, दिगांबर लोखंडे व दुर्गा धुर्वे तसेच शेकाप समर्थित कांता हरबडे, संजय वाडिवा, दिनकर रेवस्कर व वंदना धुर्वे यांचा समावेश आहे. काटाेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांपैकी दाेन जागा राष्ट्रवादीकडे तर प्रत्येकी एक जागा भाजप व शेकापकडे आहे. पंचायत समितीच्या आठ जागांपैकी पाच जागा राष्ट्रवादीकडे तर काँग्रेस, भाजप व शेकापकडे प्रत्येकी एक जागा आहे.