एनसीसी कॅडेट्सचे रक्तदानाच्या मानवीय कार्याला समर्थन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST2021-07-19T04:07:03+5:302021-07-19T04:07:03+5:30
नागपूर : लाेकमतचे संस्थापक व स्वातंत्र्य संग्राम सैनिक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘लाेकमत रक्ताचे नाते’ रक्तदान अभियान राबविले ...

एनसीसी कॅडेट्सचे रक्तदानाच्या मानवीय कार्याला समर्थन ()
नागपूर : लाेकमतचे संस्थापक व स्वातंत्र्य संग्राम सैनिक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘लाेकमत रक्ताचे नाते’ रक्तदान अभियान राबविले जात आहे. डाॅ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमीच्या एनसीसी कॅडेट्स व विद्यार्थ्यांनी समर्थन केले आहे. या मानवीय कार्यात विद्यार्थ्यांनी माेठ्या संख्येने सहभाग घेतला. डाॅ. आंबेडकर काॅलेज स्पाेर्ट्स अकादमीतर्फे (डीएसीएसए) काॅलेज परिसरात हे शिबिर आयाेजित करण्यात आले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सरई ससाई यांनी शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी काॅलेजच्या प्राचार्या डाॅ. भुवनेश्वरी मेहरे, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डीएसीएसएचे सचिव डाॅ. अरविंद जाेशी प्रामुख्याने उपस्थित हाेते. डीएसएसीएसएचे शैलेश राऊलकर, लाईफ लाईन ब्लडबॅंकेचे डाॅ. अभिजित मानकर, प्रा. सुजित चव्हाण, नयनाल उईके, डी.एस. बाेरकर, सराेज पाैनीकर, अरुण मरांडे, शुभांगी धनविजय, अंजली मिश्रा, विकास बावणे, अक्षय राऊत, राहुल बाहे आदींचा सहभाग हाेता.