नक्षलग्रस्त भागात आगळीवेगळी दिवाळी
By Admin | Updated: November 10, 2016 03:10 IST2016-11-10T03:10:18+5:302016-11-10T03:10:18+5:30
‘सर्व ग्रामाला सुखी करावे’, अन्न, वस्त्र, पालादि द्यावे, या विचाराने मैत्री परिवार संस्था व जीमलगट्टा पोलीस विभाग

नक्षलग्रस्त भागात आगळीवेगळी दिवाळी
मैत्री परिवाराचा पुढाकार : २३० महिलांना साडी व फराळाची भेट
नागपूर : ‘सर्व ग्रामाला सुखी करावे’, अन्न, वस्त्र, पालादि द्यावे, या विचाराने मैत्री परिवार संस्था व जीमलगट्टा पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीनिमित्त आदिवासी महिलांचा स्नेहमेळावा गोविंदगाव, ता. अहेरी येथे आयोजित करण्यात आला होता. २३० महिलांना साडी व संपूर्ण फराळाचे पॅकेट भेट म्हणून देण्यात आले.
प्रभारी अधिकारी अविनाश गायकवाड यांनी गावातील एकूण स्थितीचा व सांस्कृतीचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुणे जिल्हा सहकारी बँक गडचिरोली व बँकेचे अध्यक्ष प्रचित पोरेड्डीवार होते. गोविंदगावच्या सरपंच शंकरी प्रोसेट यांनी उपस्थित महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, मुलींना शाळेत आवाहन केले. कार्यक्रमाचे उद्घाटक मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे म्हणाले की, घर स्वच्छ असले की, घरात लक्ष्मी नांदते. लक्ष्मी याचा अर्थ फक्त पैसा नसून आरोग्य, समाधान, आनंद हा आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगितले की, सर्व अधिकारी वर्गाने याच गावात राहून दिवाळी सण साजरा केला. या भागात गुन्हे कमी झाले आहे. या कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संदीप वांगेकर यांनी केले. यावेळी गंगाराम साखरकर, माधुरी यावलकर, अर्चना कोट्टेवार, सुहास खरे, मनोज बंड, दिलीप ठाकरे, डॉ. सुधाकर बोरकर, डॉ. राजेश काळे, सुशील सकदेव असे मैत्री परिवारातील ३० सदस्य सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)