नव्वासह चौघांना जन्मठेप

By Admin | Updated: June 27, 2015 03:10 IST2015-06-27T03:10:54+5:302015-06-27T03:10:54+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी शुक्रवारी पिंटू शिर्के हत्याकांडातील आरोपी ...

Nawawas gave life to all four | नव्वासह चौघांना जन्मठेप

नव्वासह चौघांना जन्मठेप

हायकोर्ट : पिंटू शिर्के हत्याकांड
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी शुक्रवारी पिंटू शिर्के हत्याकांडातील आरोपी मारोती ऊर्फ नव्वा संतोषराव वलके, मंगेश शिवाजीराव चव्हाण, पांडुरंग मोतीराम इंजेवार व महेश दामोदर बांते यांनाही अपेक्षेप्रमाणे जन्मठेपेचीच शिक्षा सुनावली.
२२ जून रोजी उच्च न्यायालयाने प्रकरणातील अपिलांवर निर्णय देताना या चार आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरविले होते. त्या दिवशी आरोपींचे वकील न्यायालयात उपस्थित नसल्यामुळे शिक्षा सुनावण्यासाठी आजची तारीख देण्यात आली होती. शिक्षा सुनावण्यापूर्वी आरोपींच्या वकिलांनी विविध मुद्दे मांडून दयाभाव दाखविण्याची विनंती केली.
१० आठवड्यांचा वेळ
नव्वासह चौघांना जन्मठेप

नागपूर : न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपींना जन्मठेपेचीच शिक्षा सुनावली. तसेच, आरोपींना आत्मसमर्पण करण्यासाठी १० आठवड्यांचा वेळ दिला. १९ जून २००२ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सहाव्या माळ्यावर आरोपींनी पिंटू शिर्केला गुप्ती, चाकू, कुकरी व भाल्याच्या पात्याने हल्ला करून ठार मारले होते. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे व संगीता जाचक यांनी बाजू मांडली.
एकूण ११ आरोपींना जन्मठेप
याप्रकरणात १५ पैकी ११ आरोपींना जन्मठेप झाली आहे. १८ आॅक्टोबर २०१३ रोजी सत्र न्यायालयाने १५ पैकी ८ आरोपींना जन्मठेप सुनावली होती. यापैकी विजय किसनराव मते, राजू विठ्ठलराव भद्रे, उमेश संपतराव डहाके, रितेश हिरामण गावंडे, किरण उमराव कैथे, कमलेश सीताराम निंबर्ते व दिनेश देवीदास गायकी या सात आरोपींची जन्मठेप उच्च न्यायालयात कायम राहिली. अन्य एक आरोपी अयुब खान अमीर खानला संशयाचा लाभ मिळून निर्दोष सुटला. याशिवाय सत्र न्यायालयाने उर्वरित सात आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली होती. यापैकी नव्वा वलके, मंगेश चव्हाण, पांडुरंग इंजेवार व महेश बांते यांना उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर, अन्य आरोपी मयूर ऊर्फ बंटी शिवाजीराव चव्हाण, राजेश दयाराम कडू व संदीप नीळकंठराव सनस यांचे निर्दोषत्व कायम ठेवले.

Web Title: Nawawas gave life to all four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.