शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

नागपुरातील नवोदय अर्बन बँक घोटाळा : अशोक धवड यांचे सत्र न्यायालयात आत्मसमर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 20:35 IST

ठेविदारांच्या पैशांवर डल्ला मारणारे नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके चे अध्यक्ष व माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) यांनी सोमवारी दुपारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात आत्मसमर्पण केले.

ठळक मुद्देपोलिसांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठेविदारांच्या पैशांवर डल्ला मारणारे नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके चे अध्यक्ष व माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) यांनी सोमवारी दुपारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात आत्मसमर्पण केले. त्यानंतर धंतोली पोलिसांनी त्यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले.बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयाचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून धवड व इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. २०१४-१५ मध्ये बँकेतून ४ कोटी ३ लाख रुपयांची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्राच्या आधारे ती रक्कम बँकेला परत केल्याचे दाखवण्यात आले. प्रकाश शर्मा व विकेश जोशी यांच्या नावाने प्रत्येकी १ कोटी १५ लाख रुपयाचे बनावट कर्ज प्रकरण तयार करण्यात आले. अशा विविध प्रकारे बँकेत घोटाळा करण्यात आला.सर्वोच्च न्यायालयापर्यंत दिलासा नाहीअटकपूर्व जामिनासाठी धडपडणारे अशोक धवड यांना सर्वोच्च न्यायालयापर्यंत दिलासा मिळाला नाही. सुरुवातीला सत्र न्यायालयाने धवड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला. गेल्या ३१ जुलै उच्च न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे धवड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. तेथेही त्यांना दणका बसला. त्यामुळे त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आता ते एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करतील.यांची चौकशीया प्रकरणात अशोक धवड यांच्यासह बँक संचालिका किरण धवड, संचालक विजय जोशी, गोविंद जोशी, मुकेश जोशी, राकेश जोशी, विकेश जोशी, प्रकाश शर्मा, सचिन मित्तल, प्रीती मित्तल, बालकिशन गांधी, लिना गांधी, हिंगल ग्रुप, झाम ग्रुप, ग्लॅस्टोन ग्रुप, सिगटिया ग्रुप, देवघरे बिल्डर्स, सोमकुवर ग्रुप, गुलरांधे ग्रुप, पिरॅमिड ग्रुप व ३० कर्जदारांची या घोटाळ्यात काय भूमिका आहे याची चौकशी पोलीस करणार आहे. धवड यांचा ताबा मिळाल्यामुळे त्यांना अनेक प्रश्नांची उत्तरे प्राप्त होतील असे सुत्रांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Ashok Dhawadअशोक धवडbankबँकfraudधोकेबाजीSessions Courtसत्र न्यायालयnagpurनागपूर