शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

नवोदय अर्बन बँक घोटाळा : अशोक धवड यांची सात दिवसाची पोलीस कोठडी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 9:13 PM

एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी नवोदय अर्बन को-ऑ परेटिव्ह बँक आर्थिक घोटाळ्यातील आरोपी माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) यांचा सात दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड (पीसीआर) मंजूर केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बुधवारी नवोदय अर्बन को-ऑ परेटिव्ह बँक आर्थिक घोटाळ्यातील आरोपी माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) यांचा सात दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड (पीसीआर) मंजूर केला. धवड मुख्य आरोपी असून ते बँकेचे अध्यक्ष होते.सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊनही अटकपूर्व जामीन मिळविण्यात अपयश आल्यानंतर धवड यांनी गेल्या सोमवारी विशेष सत्र न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले. तसेच, पोलीस कोठडी रिमांडसाठी त्यांना बुधवारी विशेष सत्र न्यायालयात हजर केले. दरम्यान, त्यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करायची असल्याचे कारण सांगून धवड यांचा १४ दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मागितला. धवड यांच्या वकिलाने या मागणीला विरोध करून सात दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड पुरेसा असल्याचा दावा केला. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता सात दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला. धवड यांच्यातर्फे अ‍ॅड. चैतन्य बर्वे तर, सरकारतर्फे अ‍ॅड. अभय जिकार यांनी बाजू मांडली.३८.७५ कोटीचा घोटाळाबँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयाचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून धवड व इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. २०१४-१५ मध्ये बँकेतून ४ कोटी ३ लाख रुपयांची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्राच्या आधारे ती रक्कम बँकेला परत केल्याचे दाखवण्यात आले. प्रकाश शर्मा व विकेश जोशी यांच्या नावाने प्रत्येकी १ कोटी १५ लाख रुपयाचे बनावट कर्ज प्रकरण तयार करण्यात आले. अशा विविध प्रकारे बँकेत घोटाळा करण्यात आला.

टॅग्स :Ashok Dhawadअशोक धवडbankबँकfraudधोकेबाजीCourtन्यायालय