शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

नवोदय बँकेच्या मुख्यालयात गुन्हे शाखेची धडक : ३९ कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:22 PM

नियमांना तिलांजली देत अनेकांना कोट्यवधींचे कर्ज वाटून ३९ कोटींचा घोटाळा झालेल्या नवोदय बँकेच्या मुख्यालयात गुरुवारी गुन्हे शाखेचे पथक धडकले. या पथकाने घोटाळ्याच्या चौकशीसोबतच ११५ प्रकरणांची कागदपत्रे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याने बँकेचे अध्यक्ष अशोक धवड, त्यांची पत्नी किरण धवड तसेच संबंधित संचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे पोलिसांनी कारवाईचा पवित्रा घेतल्याने संबंधित वर्तुळातही प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे कागदपत्रे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू : बँकिंग क्षेत्रात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नियमांना तिलांजली देत अनेकांना कोट्यवधींचे कर्ज वाटून ३९ कोटींचा घोटाळा झालेल्या नवोदय बँकेच्या मुख्यालयात गुरुवारी गुन्हे शाखेचे पथक धडकले. या पथकाने घोटाळ्याच्या चौकशीसोबतच ११५ प्रकरणांची कागदपत्रे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याने बँकेचे अध्यक्ष अशोक धवड, त्यांची पत्नी किरण धवड तसेच संबंधित संचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे पोलिसांनी कारवाईचा पवित्रा घेतल्याने संबंधित वर्तुळातही प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने बुधवारी, १५ मे रोजी बँकेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी तसेच कर्जदारांच्या विरुद्ध फसवणूक, कटकारस्थान, गुन्हेगारी षड्यंत्र रचल्याच्या आरोपावरून एमपीआयडी तसेच आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. पदाचा दुरुपयोग करून बँकेच्या संचालक मंडळाने नियमांचे उल्लंघन करून एकाच व्यक्तीला वारंवार कर्ज दिले. थकीत कर्जदाराचे तारण असलेली मालमत्ता तसेच कागदपत्रे परत केली. अनेक बनावट कर्जदारांना लाखोंचे कर्ज वाटले. वादग्रस्त मालमत्तेला तारण ठेवून बँकेचे लाखोंचे नुकसान केले. रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक प्रतिबंध लावले असूनदेखिल बँकेच्या कॉम्प्युटरमध्ये बनावट नोंदी करत २०१० ते २०१७ या कालावधीत बँकेला ३९ कोटींचा चुना लावण्यात आला. लेखा परीक्षक श्रीकांत सुपे यांनी केलेल्या चौकशीत ३८ कोटी, ७५ लाख, २० हजार, ६४१ रुपयांचा गोलमाल झाल्याचा अहवाल मिळाल्याने पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी बँकेच्या संचालकांवर गुन्हे दाखल केले.लेखा परीक्षण अहवालात २५ जणांवर ठपकाकाँग्रेसचे माजी आमदार अशोक धवड वर्ष २०१० पासून बँकेचे अध्यक्ष आहेत. घोटाळ्यात त्यांचा सर्वाधिक सहभाग आहे. कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्यात अशोक धवड आणि त्यांची पत्नी किरण धवड, चुलत भाऊ मधुकर धवड यांच्यासह उपाध्यक्ष कृष्णराव निरुळकर, संचालक नाना देवलकर, विजय बाभरे, अरविंद धवड, देवराव मेश्राम, प्रमोद डाखोळे, राजेंद्र पिंपळकर, अरुण पाटील, दिलीपकुमार अग्रवाल, ताराचंद चरडे, सतीश हरडे, प्रभाकर धानोरकर, शिवराम गुरनुले, रोशनी कलमकार, जी. बालसुब्रमण्यम, तज्ज्ञ संचालक प्रवीण राऊत, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी समीर चट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नाईक, माजी व्यवस्थापक राजेश बांते, कर्मचारी तारकेश्वर ठाकरे व राजेश बोगुल, शाखाधिकारी अशोक पिंपळाघरे यांचा सक्रिय सहभाग असल्याचे वैधानिक लेखा परीक्षण अहवालात नमूद केले आहे.चार वर्षांपूर्वीच तक्रारबँकेतील आर्थिक अफरातफरीची तक्रार गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाला २०१५ मध्येच प्राप्त झाली होती. तत्कालीन एसआयटीकडे हे प्रकरण गेले होते. मात्र, कारवाईच्या नावाखाली टाइमपास झाला. बुधवारी गुन्हा दाखल होताच आर्थिक शाखा सक्रिय झाली. वरिष्ठांच्या आदेशानुसार, तपास पथकाने बँकेच्या धंतोलीतील सिल्व्हर पॅलेसमधील मुख्यालयात धडक दिली. घोटाळ्याशी संबंधितांना विचारपूस करून दस्तावेज ताब्यात घेण्यात आले. बँकेने ४० जणांचे ११५ कर्ज आवेदन मंजूर केले. या प्रकरणात नियमांना तिलांजली देत बँकेला ३९ कोटींचा फटका देण्यात आला.बचावासाठी धावपळ वाढलीप्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता कागदपत्रे, कॉम्प्युटर तसेच अन्य दस्तावेजांची छाननी, तपासणी आणि जप्ती प्रक्रियेला दोन ते तीन दिवस लागू शकतात. दस्तावेज जप्त केल्यानंतर पोलीस या घोटाळ्याशी संबंधित आरोपींकडे चौकशी करणार आहेत. यात बँकेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी कर्जदारांसह ८० पेक्षा जास्त जणांचा समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची सक्रियता लक्षात घेत आरोपींनी आपल्या बचावासाठी धावपळ वाढवली आहे. बचावासाठी काही आरोपी आजारपणाचे कागदपत्र बनविण्यातही गुंतल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी