शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात येण्यास इच्छुक नवनीत राणांची महासंमेलनात चर्चा; जागोजागी पोस्टर्स, नेत्यांचे फोटो!

By योगेश पांडे | Updated: March 4, 2024 21:18 IST

भाजयुमोच्या महासंमेलनाच्या माध्यमातून अनेक राजकीय वक्तव्ये राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडून देण्यात आली.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: भाजयुमोच्या महासंमेलनाच्या माध्यमातून अनेक राजकीय वक्तव्ये राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडून देण्यात आली. मात्र महासंमेलनात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणावरील उपस्थितीत व परिसरातील केलेली पोस्टरबाजी हा चर्चेचा मोठा विषय ठरला. नवनीत राणा भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा असताना कार्यक्रमाच्या वेळी दाखविलेली ताकद हा नेमका कुठला संकेत होता असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानात सोमवारी या महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारपासूनच राज्याच्या विविध भागातून कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली होती. भाजपने कार्यकर्त्यांसाठी पक्षाकडून भगव्या टी शर्ट व टोप्या दिल्या होत्या. मात्र त्यातही पांढऱ्या टी शर्टमधील अनेक कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. प्रत्यक्षात हे सर्व अमरावती व आजुबाजुच्या परिसरातून आलेले युवा स्वाभीमान पक्षाचे कार्यकर्ते होते. टी शर्ट वर नवनीत राणा यांचे चित्र होते. अंबाझरीपासून कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या मार्गावरदेखील जागोजागी नवनीत राणा यांचे पोस्टर्स लागले होते.

या पोस्टर्सवर नाव युवा स्वाभिमान पक्षाचे होते. मात्र त्यावर पंतप्रधान मोदींपासून राज्यातील भाजप नेत्यांचे चेहरे होते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते. कार्यक्रम सुरू होत असताना राणा स्वत: मंचावर आल्या. त्यामुळे राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशच होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र कार्यक्रमात असे काहीही झाले नाही.

राणा यांचे ‘सेफ’ वक्तव्य

यासंदर्भात राणा यांना विचारणा केली असता त्यांनी ठोस उत्तर देण्याचे टाळले. विदर्भाच्या विकासासाठी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस व भाजपच्या नेत्यांनी खूप काही केले आहे. भाजपचे नेते माझ्या कुटुंबाचाच भाग आहेत, अ पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मी आहे व पुढेदेखील राहणार आहे. एखाद्या चिन्हावर लढण्यापेक्षा संबंधितांसोबत राहणे जास्त महत्त्वाचे असते, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

पक्ष नेत्यांचे कट आऊट्स

दक्षिण भारतातील प्रचारशैलीप्रमाणे आता मोठे कट आऊट्स लावण्यावर भर देण्यात येत आहे. कार्यक्रमस्थळाकडे जाणारा मार्ग व प्रत्यक्ष मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे व शहराध्यक्ष बंटी कुकडे यांचे मोठे कट आऊट्स लागले होते.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४