शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नवनीत राणा म्हणतात, बच्चू कडू यांचं स्वत:वरचं नियंत्रण गेलं; उद्धव ठाकरेंवरही केली खोचक टीका

By कमलेश वानखेडे | Updated: September 30, 2022 17:37 IST

उद्धव ठाकरे एक अपरिपक्व राजकारणी असल्याची टीका

नागपूर : बच्चू कडू यांचे स्वत:वरचे नियंत्रण गेले आहे. त्यांनी स्वत:ला सांभाळायला पाहिजे. कार्यकर्त्यांना मारहाण, असं वागणं हा कार्यकर्त्यांचा अपमान आहे. कार्यकर्ता आहेत म्हणून आम्ही आहेत, कार्यकर्त्यांचा सन्मान बच्चू कडू यांनी ठेवायला हवा, अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधत त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला. 

नागपुरात पत्रकारांशी बोलताना राणा यांनी बच्चू कडू यांच्यासह माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही नेम साधला. उद्धव ठाकरे हे एक अपरिपक्व राजकारणी आहेत. त्यांच्या राजकीय वक्तव्यावरुन ते परिपक्व आहे असे वाटत नाही. ते बाळासाहेबांचे सुपूत्र आहेत असंही वाटत नाही. ५६ वर्षे ते त्यांच्या परिवारात आहे. मात्र त्यांनी १० टक्केही मिळवलं नाही. त्यांनी बाळासाहेबांचे सर्वस्व गमावलं. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे या जमिनीवर राहून संघर्ष करु शकत नाही, अशी खोचक टीका राणा यांनी केली.

धनुष्यबाण शिंदे गटाकडे असेल

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना येवढा संघर्ष केला असता तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद असती. त्यांच्या दसरा मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार आहेत. हिंदूत्व आणि बाळासाहेबांचे विचार ऐकायला शिंदे यांच्या मेळाव्यात लोक येतील. निवडणूक आयोग शिंदे गटाच्या बाजूने निर्णय देणार. धनुष्यबाण शिंदे यांच्याकडे असेल, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारणnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBacchu Kaduबच्चू कडूUddhav Thackerayउद्धव ठाकरे