निव्ह मार्शल महाराष्ट्र क्वीन
By Admin | Updated: August 26, 2014 01:00 IST2014-08-26T01:00:31+5:302014-08-26T01:00:31+5:30
रिद्धी-सिद्धी कल्चरल प्रमोशनल आॅर्गनायझेशनच्यावतीने आयोजित ‘फॅशन शो’मध्ये मुंबई येथील निव्ह मार्शल हिने ‘गुरुदेव यामाहा महाराष्ट्र क्वीन-२०१४ ’चा किताब पटकाविला. तसेच नीलम वीरवानी

निव्ह मार्शल महाराष्ट्र क्वीन
फॅशन शो : नीलम उपविजेता तर विनीताला तृतीय पुरस्कार
नागपूर : रिद्धी-सिद्धी कल्चरल प्रमोशनल आॅर्गनायझेशनच्यावतीने आयोजित ‘फॅशन शो’मध्ये मुंबई येथील निव्ह मार्शल हिने ‘गुरुदेव यामाहा महाराष्ट्र क्वीन-२०१४ ’चा किताब पटकाविला. तसेच नीलम वीरवानी ही उपविजेता ठरली असून, विनीता टेकचंदानी हिने तृतीय पुरस्कार मिळविला.
सोमवारी वसंतराव देशपांडे सभागृहात ही स्पर्धा पार पडली. यावेळी अतिथी म्हणून जनार्दन मिश्रा, काँग्रेसचे माजी शहर प्रमुख जयप्रकाश गुप्ता, आलोक बन्सल, अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया व सतीश गोयल उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत नागपूरसह मुंबई, पुणे व गोवा येथील एकूण १५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या संपूर्ण स्पर्धेत तीन फेऱ्या झाल्या. यापैकी पहिल्या फेरीत १५ पैकी १० उत्तम स्पर्धकांची निवड करण्यात आली. तसेच दुसऱ्या फेरीत १० पैकी ६ निवड करून, अंतिम तिसऱ्या फेरीत विजेत्याची घोषणा करण्यात आली. या संपूर्ण स्पर्धेत अखिलेश चतुर्वेदी, स्वर्णिमा खरे, सर्वेश अग्रवाल, रुचिता अग्रवाल व लोपमुद्रा राऊत यांनी परीक्षकांची भूमिका पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेचे आयोजक दिनेश मिश्रा, दीपाली मिश्रा व शाकीत शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. दरम्यान, ‘गुरूदेव यामाहा महाराष्ट्र क्वीन-२०१४ ’चा किताब पटकाविणाऱ्या निव्ह मार्शल हिला यामाहा कंपनीची स्कूटर भेट देण्यात आली. संचालन पूनम कुकरेजा यांनी केले. (वाणिज्य प्रतिनिधी)
राहुलच्या गाण्यांनी भरला जोश
या सौंदर्य स्पर्धेत तरुण गायक राहुल मुखर्जी याच्या गीतांनी जोश भरण्याचे काम केले. त्याने ‘विठ्ठला विठ्ठला, श्री गणेश देवा..., मैं तेनू समजा वा जी... व हम तेरे बिन अब रह नहीं सकते...’ अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून सभागृहाच्या जोरदार टाळ्या मिळविल्या.