डीजेकडून देशी पिस्तूल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST2021-06-16T04:10:14+5:302021-06-16T04:10:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बजाजनगर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री एका आरोपीला पकडून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. डीजे ...

Native pistol seized from DJ | डीजेकडून देशी पिस्तूल जप्त

डीजेकडून देशी पिस्तूल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बजाजनगर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री एका आरोपीला पकडून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. डीजे ऊर्फ सुगत मनोहर सावरकर (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. तो प्रतापनगरातील गायत्री मंदिराजवळ राहतो.

रविवारी मध्यरात्री एक आरोपी तात्या टोपे नगरात पिस्तूल विकण्यासाठी येणार असल्याची टीप बजाजनगर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी रविवारी रात्री ११.३० पासून त्या भागात सापळा रचला. अत्रे-लेआउटसमोर आरोपी डीजे ऊर्फ सुगत संशयास्पद अवस्थेत दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल आढळले. ते आणि त्याची दुचाकी जप्त करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

---

डीजे वाजलाच नाही

आरोपीला मध्यरात्री अटक केल्यानंतर बजाजनगरच्या ठाणेदार शुभांगी देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी डीजेला बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने ते पिस्तूल कुठून आणले, कुणासाठी आणले, त्याबाबत काहीही माहिती दिली नाही. आरोपीचा पीसीआर मिळविल्यानंतर बाजीराव दाखवून डीजेला वाजविण्याचा पोलिसांनी विचार केला होता. मात्र, न्यायालयातून डीजेला जामीन मिळाल्याने पोलिसांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात राहिली.

---

Web Title: Native pistol seized from DJ