आशांचा देशव्यापी संप सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST2021-05-23T04:07:45+5:302021-05-23T04:07:45+5:30

आशा व गटप्रवर्तक यांना कोरोनाकाळात नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे राबविले जात आहे. परंतु त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. घराेघरी जाऊन ...

A nationwide strike of hope on Monday | आशांचा देशव्यापी संप सोमवारी

आशांचा देशव्यापी संप सोमवारी

आशा व गटप्रवर्तक यांना कोरोनाकाळात नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे राबविले जात आहे. परंतु त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. घराेघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण करण्यासह लसीकरणाच्या कामातही त्यांचे याेगदान आहे. सर्वेक्षणाला गेल्यावर अनेकदा त्यांच्यावर हल्लेही झाले आहेत. असे असताना उलट अधिकाऱ्यांकडून त्यांनाच काढून टाकण्याची धमकी दिली जाते. कोविड काळात सक्षम व समर्थपणे सेवा देणाऱ्या या आघाडीच्या कामगारांना कोविड योध्दा म्हणून गौरविण्यात आले, ही अभिमानाची बाब असली तरी त्यांना गरजेपुरता मोबदला दिला जात नाही. अशा भयंकर महामारीत काम करताना काहींना प्राण गमवावे लागले. परिणामी त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले, मुले पोरकी झाली. तरीही केंद्र आणि राज्य सरकार त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. आशा व गटप्रवर्तकांच्या राष्ट्रीय फेडरेशनने २४ मे रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असल्याचे सीटूचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी सांगितले.

Web Title: A nationwide strike of hope on Monday