शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

राष्ट्रीय ‘रॅकिंग’मध्ये नागपूरच्या २ शिक्षणसंस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 20:05 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’ (विश्वैश्वरैय्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपूरातील एकाही संस्थेला पहिल्या ३५ मध्ये ‘रँकिंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा देशात ३१ वा क्रमांक आहे. मागील वर्षी ‘व्हीएनआयटी’ ४२ व्या स्थानावर होते.

ठळक मुद्दे‘व्हीएनआयटी’ देशात ३१ वे : नागपूर विद्यापीठाला ‘रँकिंग’च नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’ (विश्वैश्वरैय्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपूरातील एकाही संस्थेला पहिल्या ३५ मध्ये ‘रँकिंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा देशात ३१ वा क्रमांक आहे. मागील वर्षी ‘व्हीएनआयटी’ ४२ व्या स्थानावर होते. ‘टॉप’ १०० विद्यापीठांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुठेही समावेश नाही.देशातील विद्यापीठांचे तसेच विविध शैक्षणिक संस्थाचे ‘रँकिंग’ ठरविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रस्ताव मागविले होते. देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांनी हे प्रस्ताव जानेवारी महिन्यात सादर केले होते. नागपूर विद्यापीठ तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांचादेखील यात समावेश होता.सोमवारी जाहीर झालेल्या यादीत नागपूरातील सर्वच संस्था राष्ट्रीय पातळीवर माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’चा देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांमध्ये ३१ वा क्रमांक आहे. इतर एकाही अभियांत्रिकी महाविद्यालयाला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळविता आलेले नाही. मागील वर्षी अभियांत्रिकी संस्थांच्याच यादीमध्ये ‘आरकेएनईसी’ (रामदेवबाबा कमला नेहरु इंजिनिअरींग कॉलेज) व जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय यांचा क्रमांक अनुक्रमे ६४ व ६७ वा होता. देशातील ‘टॉप’ फार्मसी महाविद्यालायंमध्ये नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ‘श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज आॅफ फार्मसी’ ला ४४ वे ‘रँकिंग’ मिळाले आहे. मध्य भारतातील शैक्षणिक हब म्हणून नागपूर शहर उदयाला येत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय व फार्मसीमधील शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली असली तरी दर्जा मात्र अद्याप हवा तसा सुधारलेला नाही, हेच या ‘रँकिंग’मधून स्पष्ट होत आहे.नागपूर विद्यापीठ शंभरात नाही‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळविणाऱ्या नागपूर विद्यापीठाला मात्र ‘रॅकिंग’ मिळविण्यात यश आलेले नाही. राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, डी.वाय.पाटील विद्यापीठ, एसव्हीकेएम नरसी मोन्जी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट स्टडीज्, भारती विद्यापीठ, डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटी, यांना या यादीत स्थान मिळाले आहे.शहरातील संस्थांचे ‘रँकिंग’अभियांत्रिकी संस्था                                             रँकिंगव्हीएनआयटी                                                       ३१फार्मसी संस्था रँकिंग‘श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज आॅफ फार्मसी’ ४४

टॅग्स :nagpurनागपूरeducationशैक्षणिक