शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

उदबत्तीसाठी उपयुक्त बांबूचे उत्पादन देशातच वाढविणार, राष्ट्रीय बांबू मिशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 2:37 AM

बांबूच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत; उत्पादन फक्त १५० मेट्रिक टन, मागणी मात्र ७ हजार मेट्रिक टनांची 

- गोपालकृष्ण मांडवकर नागपूर : उदबत्ती तयार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या बांबूची मागणी मोठी आहे. असे असले तरी यंदा देशातील बांबू उत्पादन फक्त १५० मेट्रिक टन आहे. त्यातुलनेत मागणी मात्र ६ ते ७ हजार मेट्रिक टनाची आहे. मागणी व उत्पादनाच्या असंतुलनामुळे बांबूची आयात करावी लागत आहे. यावर उपाय म्हणून बांबूचे उत्पादन देशातच वाढविण्याचा प्रयोग सरकारने हाती घेतला आहे. महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून सध्या राष्ट्रीय बांबू मिशन योजना  राबविली जात आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना उपयुक्त प्रजातीही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आजवर चीन आणि व्हिएतनाममधून बांबूची आयात केली जायची. मात्र, चीनसोबत संबंध ताणले गेल्याने आयातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशातच उत्पादन वाढविण्यासाठी अगरबत्तीसाठी उपयोगात येणारा ‘टुल्डा’ या प्रजातीचा बांबू देशातच विकसित केला जात असल्याचे मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के रेड्डी यांनी सांगितले. 

अगरबत्तीसाठी खास ‘टुल्डा’ बांबू‘टुल्डा’ या प्रजातीच्या बांबूचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या दोन पेरांमध्ये जवळपास एक फुटाचे अंतर असते. तसेच तो नरमही असतो. त्यामुळे अगरबत्तीच्या निर्मितीसाठी तो अधिक सोयीचा ठरतो. या प्रकारच्या बांबूचे उत्पादन चीन आणि व्हिएतनाम या देशांमध्येच मुबलक होते.

तीन वर्षांनंतर ‘टुल्डा’चे उत्पादन येईल हाती राज्यात सात उत्पादकांना अधिकृत पुरवठादार म्हणून जाहीर केले आहे. त्यांच्या रोपांचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय बांबू मिशनअंतर्गत जुलै-२०२० पासून आठ प्रकारचे बांबू कलम शेतकऱ्यांना पुरविण्यात आले आहेत. त्यात टुल्डाचाही समावेश आहे. तीन वर्षांनंतर त्याचे उत्पादन हाती येईल. 

टॅग्स :businessव्यवसायnagpurनागपूर