मनपाला स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार
By Admin | Updated: August 27, 2016 02:28 IST2016-08-27T02:28:52+5:302016-08-27T02:28:52+5:30
स्वच्छता, दूषित पाणी, घनकचरा व्यवस्थापन व ऊर्जा क्षेत्रात उत्तम काम करण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित

मनपाला स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार
द्वितीय क्रमांकाने गौैरव: नवी दिल्ली येथे वितरण
नागपूर : स्वच्छता, दूषित पाणी, घनकचरा व्यवस्थापन व ऊर्जा क्षेत्रात उत्तम काम करण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत नागपूर महापालिकेला द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मेस्से फ्रँकफर्ट इंडियातर्फे घनकचरा व्यवस्थापन व दूषित पाण्यावरील प्रक्रिया यासाठी काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. नगर विकास विभागाने द्वितीय पुरस्कारासाठी नागपूर महापालिकेची शिफारस केली होती. नवी दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात महापालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाचे संचालक व सल्लागार जे.बी. रवींद्रकुमार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०१६ मध्ये झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. टॉप ५ शहरांमध्ये अलाहाबाद, विशाखापट्टणम, ग्वालियर, भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)