शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

'नासुप्र'चे लाखोवर भूखंड, 'फ्री होल्ड'चे स्वप्न जवळ ! मंत्री शंभूराज देसाई यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:32 IST

Nagpur : नागपूर मनपा शहरात अस्तित्वात येण्यापूर्वी भाडेपट्टे वा लीजवर दिलेल्या लाखो भूखंड 'फ्री होल्ड' करण्यासाठी स्वतंत्र धोरणाची गरज आहे. नागपूर शहरातील हा प्रश्न सोडविताना तो राज्यातील इतर शहरातील भूखंडासाठीही लागू होऊ शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर मनपा शहरात अस्तित्वात येण्यापूर्वी भाडेपट्टे वा लीजवर दिलेल्या लाखो भूखंड 'फ्री होल्ड' करण्यासाठी स्वतंत्र धोरणाची गरज आहे. नागपूर शहरातील हा प्रश्न सोडविताना तो राज्यातील इतर शहरातील भूखंडासाठीही लागू होऊ शकतो. त्यामुळे यासाठी संबंधित विभागाची बैठक घेऊन स्वतंत्र धोरणाबाबत निर्णय घेऊ असे संकेत प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. आमदार प्रवीण दटके, मोहन मते यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. 

नागपूर शहरात २२ अभिन्यासातील सुमारे ९ हजार भूखंड आहे. तर, नासुप्रच्या अखत्यारीतील ६१,८२७भूखंड यासंदर्भातील फी होल्ड करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात सुमारे १० लाख नागरिक राहतात. हे भूखंड फ्री होल्ड केल्यास त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा मिळतील तसेच मालकी पट्टेही मिळतील, याकडे आमदार प्रवीण दटके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तर, आमदार मोहन मते यांनी मनपाने दिलेले भूखंड व गाळ्याचा गैरवापर सुरू असल्याचे सांगत या भूखंडाचा वापर दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कामासाठी होत असल्याचा मुद्दा मांडला. तसेच, दक्षिण नागपुरातील मध्यवर्ती भागात ४ वस्त्या झुडपी जंगलाच्या नोंदीत आहे. ५० वर्षांहून अधिक काळापासून त्या वसल्या आहेत, याकडे मते यांनी लक्ष वेधले. 

स्वतंत्र धोरणावरही चर्चा होईल

यासंदर्भात संबंधित विभागाचे अधिकारी लक्षवेधी उपस्थित केलेल्या आमदारांना बोलावून नगरविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. तसेच, याबाबत स्वतंत्र धोरण तयार करता येते का, त्यावर चर्चा केली जाईल, असे प्रभारी मंत्री देसाई यांनी सांगितले. आमदार दटके यांनी नासुप्रने पाठविलेला प्रस्ताव अतिरिक्त मुख्य सचिवांकडून तपासून पाठविण्यात आल्याकडे सरकारचे लक्ष वेधले.

दोनच दिवसांपूर्वी प्रस्ताव आला

मंत्री देसाई म्हणाले, भाडेपट्टी वा लीजवर दिलेल्या भूखंडांसाठी अटी व नियम आहेत. नासुप्रने फ्री होल्ड करण्यासंदर्भात १२ डिसेंबरला प्रस्ताव दिला. तो दोनच दिवसांपूर्वी आल्याने तो तपासला जात आहे. असा निर्णय एका शहरासाठी घेता येत नाही. तो इतर शहरासाठीही लागू करता येऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur land 'free hold' dream nears! Minister Desai hints at policy.

Web Summary : Minister Shambhuraj Desai indicated a separate policy for 'free hold' of leased land before Nagpur's municipal incorporation. A meeting will decide the policy, potentially applicable statewide. This move could benefit lakhs of citizens.
टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईnagpurनागपूर