नासुप्र प्लॉटधारकांनी ‘ग्राऊंड रेंट’ची डिमांड ऑनलाईन भरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:07 IST2021-05-28T04:07:40+5:302021-05-28T04:07:40+5:30

सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांचे नागरिकांना आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे ...

Nasupra plot holders should fill the demand for 'ground rent' online | नासुप्र प्लॉटधारकांनी ‘ग्राऊंड रेंट’ची डिमांड ऑनलाईन भरावी

नासुप्र प्लॉटधारकांनी ‘ग्राऊंड रेंट’ची डिमांड ऑनलाईन भरावी

सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांचे नागरिकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे कमीतकमी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यालय सुरू आहे. येत्या ३१ मेपर्यंत (शासकीय आदेशानुसार) नासुप्र व नामप्रविप्रा कार्यालयात नागरिकांना प्रवेशबंदी आहे. त्यामुळे यावर्षी नासुप्रच्या सर्व प्लॉटधारकांनी त्यांच्या ‘ग्राऊंड रेंट’ची डिमांड नासुप्रच्या ँ३३स्र://ल्ल्र३ल्लँस्र४१.ङ्म१ॅ या अधिकृत वेबसाईटवरून काढावयाची आहे व त्यानंतर ही डिमांड ऑनलाईन भरावी, असे आवाहन नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी नागरिकांना केले आहे.

नासुप्रच्या अधिकृत वेबसाईटवर ग्राऊंड रेंटची डिमांड कशी काढायची, यासंबंधित सर्व माहिती उपलब्ध आहे. डिमांड काढण्यासाठी लागणारे अकाऊंट आयडी हा प्लॉटधारकांच्या गेल्या वर्षीच्या ग्राऊंड रेंटच्या डिमांडवर उपलब्ध आहे, याची प्रत्येकांनी नोंद घ्यावी. वेबसाईटवरून डिमांड डाऊनलोड केल्यानंतर डिमांडची रक्कम शक्य असल्यास ऑनलाईन जमा करावी. तसेच ज्या नागरिकांना इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाईन डिमांड भरता येत नसल्यास त्यांनी आपली डिमांड जवळच्या युनियन बँकेच्या शाखेत जाऊन भरावी, असे आवाहन नासुप्रने केले आहे.

Web Title: Nasupra plot holders should fill the demand for 'ground rent' online