शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

नाट्यपरिषदेचा अखिल भारतीय चेहरा संकुचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:09 AM

गेल्या दीड-दोन वर्षापासून नाट्यपरिषदेचे कामकाज ज्या प्रकारे चालले आहे, त्यावरून नाट्यपरिषदेचा संपूर्ण भर पुणे-मुंबई इकडेच असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे, नाट्यपरिषदेचे अखिल भारतीय असे नाव बदलून मुंबई-पुणे नाट्यपरिषद असेच का करू नये, असा सवाल उपस्थित व्हायला लागला आहे.

ठळक मुद्देअध्यक्षांची मेहेरनजर केवळ व्यावसायिक रंगकर्मींप्रतिच

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या दीड-दोन वर्षापासून नाट्यपरिषदेचे कामकाज ज्या प्रकारे चालले आहे, त्यावरून नाट्यपरिषदेचा संपूर्ण भर पुणे-मुंबई इकडेच असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे, नाट्यपरिषदेचे अखिल भारतीय असे नाव बदलून मुंबई-पुणे नाट्यपरिषद असेच का करू नये, असा सवाल उपस्थित व्हायला लागला आहे.नाट्यपरिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रसाद कांबळी यांची वर्णी लागल्यापासून त्यांचा विदर्भ विरोधी सुर प्रकर्षाने जाणवायला लागला आहे. शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने त्यांचा हा चेहरा उघड पडला आहे. मुंबईला होणाऱ्या नाट्यसंमेलनाचा विदर्भाशी काय संबंध, अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी अनेकांजवळ उच्चारल्याने कार्यकारिणीतही त्यांच्याविषयी उघडउघड नाराजी आहे. त्यातच कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे झालेल्या टाळेबंदीत रंगकर्मी हवालदिल झाल्याच्या पार्श्वभूमीवर दहा कोटी रुपयाचा मदत निधी गोळा करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यावर विदर्भातील कलावंतांनाही या योजनेचा लाभ मिळेल, अशी आशा होती. मात्र, त्यांना जेव्हा जेव्हा विदर्भातून फोन गेले, तेव्हा तेव्हा त्यांनी ही योजना केवळ पुणे-मुुंबईच्या व्यावसायिक नाट्यकर्मींकरिताच असल्याचे स्पष्ट केले आहे. याचा अर्थ विदर्भ आणि मराठवाड्यात व्यावसायिक रंगकर्मी नाहीत, असा त्यांचा समज असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, वर्तमानात व्यासायिकांसोबत स्पर्धा करताना हौशी रंगकमीर्ही व्यावसायिकता जपत आहेत. या परिवर्तनामुळे विदर्भातील हौशी रंगकमीर्ही रंगकर्मावर उपजिविका शोधत आहेत. थेट रंगमंचावर अभिनय करणारे मोजके कलावंत रंगकर्मावर उपजिविका शोधत असले तरी नेपथ्य, प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार यांची उपजिविका तर पूर्णपणे रंगकर्मावरच विसंबून आहे. असे असतानाही अध्यक्षमहोदयांना केवळ मुंबई-पुणे येथीलच कलावंत व्यावसायिक वाटत असतील तर हा पूर्वग्रहदुषितपणाच नव्हे का, असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे. त्यामुळेच, अध्यक्षमहोदयांना जर नाटक म्हणजे मुंबई-पुणे असेच वाटत असेल आणि तिकडील कलावंतांसाठीच नाट्यपरिषद सज्ज असेल तर नाट्यपरिषदेचे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद हे सर्वसमावेशक नाव खोडून अखिल मुंबई-पुणे मराठी नाट्यपरिषद असे करणेच, योग्य ठरेल.मग, हे ओझे वाहायचेच कशाला?: सध्या नाट्यपरिषद अध्यक्षमहोदयांच्या हातचे कठपुतळीच झाल्याचे दिसून येते. अध्यक्ष म्हणतील तेच होईल आणि इतरांच्या विचारांना केराची टोपली दाखवली जाईल, असाच व्यवहार गेल्या दिड-दोन वषार्पासून सुरू आहे. अध्यक्षांचा पूर्ण कल व्यावसायिक रंगभूमीकडेच आहे. विदर्भ ही हौशी कलावंतांचे माहेरघर आहे. हौशी कलावंत त्यांच्या रडारवर नसतील तर विदभार्ने या नाट्यपरिषदेच्या शाखांना भाव का द्यावा, असा प्रश्न उपस्थित होतो. काही मोजके नाट्यसंमेलने वगळता नाट्यपरिषदेने वैदर्भीय कलावंतांसाठी कोणत्याही योजना सादर केल्या नाहीत. केवळ नाममात्र पुळका दाखवण्याचा प्रकार झालेला आहे. त्यामुळे, वैदर्भीय कलावंतांनी नाट्यपरिषदेचे ओझे वाहण्यापेक्षा स्वत:चा विचार होईल, अशी संघटना उभी करणे ही काळाची गरज झालेली आहे.नाट्यपरिषदेकडून आजवर नागपूरच्या कलावंतांसाठी कोणत्याही योजना सादर झाल्या नाहीत. विमा, ओपन थिएटर्स वगैरेंच्या मागण्यांचे पत्र त्यांच्याकडे धूळखात पडले आहेत. अशावेळी आम्ही काही कलावंत नव्या पर्यायाचा विचार करत आहोत.- स्वप्निल बोहटे, युवा रंगकर्मी

टॅग्स :cultureसांस्कृतिक