शहरातील तरुण प्रवचनकाराने पूर्ण केली नर्मदा प्ररिक्रमा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:14 IST2021-03-13T04:14:26+5:302021-03-13T04:14:26+5:30
नागपूर : नर्मदा परिक्रमा करणे हे अनेकांचे ध्येय असते. वारकरी संप्रदायातील लाेकांसाठी तर ही एक साधनाच असते. अनेक जण ...

शहरातील तरुण प्रवचनकाराने पूर्ण केली नर्मदा प्ररिक्रमा ()
नागपूर : नर्मदा परिक्रमा करणे हे अनेकांचे ध्येय असते. वारकरी संप्रदायातील लाेकांसाठी तर ही एक साधनाच असते. अनेक जण तसा प्रयत्नही करतात, पण खडतर प्रवासामुळे त्यात अपयशही येते. मात्र नागपूरच्या तरुण प्रवचनकाराने या खडतर प्रवासाचे आव्हान स्वीकारत ३,५०० किलाेमीटरची नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली. हभप कुणाल महाराज फुलझेले असे त्यांचे नाव.
या प्रवासात त्यांच्यासाेबत जिल्ह्यातील आणखी दाेन प्रवचनकारही हाेते. हभप कुणाल महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ मंडळाचे सदस्य आहेत. नुकतीच परिक्रमा पूर्ण केल्यानंतर हभप फुलझेले नागपूरला परतले तेव्हा त्यांचे जल्लाेषात स्वागत करण्यात आले. वारकरी संप्रदायाचे पाईक असलेल्यांसाठी नर्मदा परिक्रमा करणे हे एक ध्येय असते. हभप कुणाल यांनीही ते पूर्ण करण्याचा संकल्प केला. त्यानुसार गेल्या वर्षी ८ डिसेंबर राेजी त्यांनी ही यात्रा सुरू केली. नर्मदा परिक्रमा अत्यंत कठीण मानली जाते. जंगलातून प्रवास करताना हिंस्र श्वापदांचाही सामना हाेताे. मात्र फुलझेले यांनी न डगमगता प्रवास चालविला. ८५ दिवसाच्या कठीण प्रवासानंतर त्यांनी आपले लक्ष्य गाठले. नर्मदा नदी आपल्या प्रवासाच्या शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. हे संगमाचे दृश्य पाहणे अप्रतिम असते. हभप कुणाल यांनी या शेवटच्या टाेकावर ६ मार्च राेजी त्यांची परिक्रमा पूर्ण केली. हभप कुणाल यांचे नागपूरला आगमन झाले तेव्हा वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळी तसेच ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी दिंडीचे आयाेजन करून त्यांचे स्वागत केले. ही परिक्रमा म्हणजे आयुष्यातील खूप माेठी साधना ठरल्याची भावना त्यांनी लाेकमतशी बाेलताना व्यक्त केली.