केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र; भाजप युतीला शतप्रतिशत यश मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 14:51 IST2019-10-10T14:51:31+5:302019-10-10T14:51:54+5:30
महाराष्ट्रतील जनताही भाजप युतीला १०० टक्के यशस्वी करील, असा विश्वास केंद्रीय रेल व वाणिज्य मंत्री भाजप नेते पियुष गोयल यांनी आज येथे पत्रपरिषदेत व्यक्त केला.

केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र; भाजप युतीला शतप्रतिशत यश मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रात नरेंद मोदी आणि राज्यात देवेन्द्र फडणवीस हे विकास कामाचे डबल इंजिन म्हणून काम करीत आहेत, मोदी सरकारला देशाने पुन्हा भरघोस मतांनी निवडून दिले त्याच प्रकारे महाराष्ट्रतील जनताही भाजप युतीला १०० टक्के यशस्वी करील, असा विश्वास केंद्रीय रेल व वाणिज्य मंत्री भाजप नेते पियुष गोयल यांनी आज येथे पत्रपरिषदेत व्यक्त केला.
ब्रॉड गेज मेट्रोच्या डीपीआर रेल्वेकडे आला आहे, महिनाभरात निर्णय होणार आहे. नाशिकमध्ये राबवण्यात येणारी मिनी मेट्रो ही संकल्पना नरेंद्र मोदी यांना खूप आवडली आहे. मी सुद्धा प्रभावित झालो आहे. ती वाराणसीसह देशातील टू टायर व थ्री टायर शहरांमध्ये राबवली जाईल. महाराष्ट्रात भाजपमध्ये कुठलीही बंडखोरी नसल्याचा दावाही त्यांनी केला.
मोहन भागवत आमचे मार्गदर्शक
मोहन भागवत हे आमचे मोठे बंधू व मार्गदर्शक आहेत, त्यांच्याकडून चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत असते, त्यांनी मला भेटण्यासाठी वेळ दिली. चांगले मार्गदर्शन मिळाले असेही ते पुढे म्हणाले.