आज उजळणार ‘नंदा-दीप’

By Admin | Updated: March 5, 2017 01:49 IST2017-03-05T01:49:22+5:302017-03-05T01:49:22+5:30

महापालिकेत सत्तेची हॅट्ट्रिक मारणाऱ्या भाजपाच्या कारभाराची आज, रविवारपासून पुन्हा एक नवी सुरुवात होणार आहे.

'Nanda-Deep' will light up today | आज उजळणार ‘नंदा-दीप’

आज उजळणार ‘नंदा-दीप’

पदग्रहण : नंदा जिचकार महापौर तर उपमहापौरपदी दीपराज पार्डीकर
नागपूर : महापालिकेत सत्तेची हॅट्ट्रिक मारणाऱ्या भाजपाच्या कारभाराची आज, रविवारपासून पुन्हा एक नवी सुरुवात होणार आहे. महालातील नगरभवनात सकाळी १० वाजता आयोजित विशेष सभेत महापौरपदी भाजपाच्या नंदा जिचकार यांची तर उपमहापौर म्हणून दीपराज पार्डीकर यांची निवड केली जाणार आहे.

१५१ नगरसेवकांच्या महापालिकेत भाजपचे तब्बल १०८ नगरसेवक पोहचले आहेत. संख्याबळ नसतानाही काँग्रेसतर्फे महापौरपदासाठी नेहा विवेक निकोसे यांनी तर उपमहापौरपदासाठी नितीश ग्वालबंशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बसपातर्फे महापौर पदासाठी वंदना चांदेकर यांनी तर उपमहापौर पदासाठी नरेंद्र वालदे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अल्पमताात असलेल्या विरोधकांना एकजूट दाखविता आलेली नाही. महापालिकेतील संख्याबळाचा विचार करता जिचकार व पार्डीकर यांची निवड निश्चित असल्याने ही निवडणूक एक औपचारिकताच ठरणार आहे.
भाजपचे निरीक्षक व प्रभारी आ. अनिल सोले यांनी गेल्या बुधवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित भाजप नगरसेवकांच्या बैठकीत महापौर व उपमहापौर यांच्यासह स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संदीप जाधव तर सत्तापक्षनेते म्हणून संदीप जोशी यांच्या नावाची घोषणा केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: 'Nanda-Deep' will light up today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.