नाना पटोलेंचा 'तो गावगुंड मोदी' अखेर अवतरला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 08:13 PM2022-01-21T20:13:10+5:302022-01-21T20:33:32+5:30

Nagpur News काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्या मोदीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं तो गावगुंड मोदी अखेर नागपुरात अवतरला.

Nana Patole's gangster Modi finally appeared | नाना पटोलेंचा 'तो गावगुंड मोदी' अखेर अवतरला 

नाना पटोलेंचा 'तो गावगुंड मोदी' अखेर अवतरला 

Next

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्या मोदीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं तो गावगुंड मोदी अखेर नागपुरात अवतरला. ॲड. सतीश उके यांनी या तथाकथित गावगुंड मोदीला शुक्रवारी पत्रकारांसमोर आणलं. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देताना या मोदीला चांगलाच घाम फुटला.

भंडारा जिल्ह्याच्या गोंदी या गावातील हा गावगुंड मोदी दारू विकतो, पितो आणि त्यातूनच त्यानं नाना पटोले यांच्याविरोधात अपशब्द बोलले आणि त्यांच्या विरोधात प्रचार केला, असा दावा ॲड. सतीश उके यांनी केलाय. मुळात या मोदीचं मूळ नाव उमेश घरडे ऊर्फ मोदी असं आहे. अनेक लोक त्याच्या मागे लागले. त्यामुळं तो घाबरून आपल्याकडे आला आणि आपण त्याला माध्यमांसमोर आणल्याचं उके यांनी सांगितलं. आपण दारू विकत होतो, दारू पितो, पत्नी आपल्याला सोडून गेली, आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि विरोधात प्रचार केला, असं सांगत २०२० पासून आपल्याला मोदी असं टोपण नाव पडल्याचं सांगितलं. मात्र, मोदी नाव कसं पडलं हे तो सांगू शकला नाही.

Web Title: Nana Patole's gangster Modi finally appeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app