शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

स्थानिक स्वराज्य संस्थेत नाना पटोलेंचा पुन्हा ‘एकला चलो’चा नारा

By कमलेश वानखेडे | Updated: May 16, 2023 18:24 IST

Nagpur News राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र वेगळा सूर लावला आहे.

कमलेश वानखेडे

नागपूर : राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र वेगळा सूर लावला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितिच्या आधारावर लढण्याचा निर्णय घेऊ, काही ठिकाणी काँग्रेस एकटीही लढू शकते, असे सांगत पटोले यांनी पुन्हा ‘एकला चलो’ चा नारा दिला आहे.

पटोले म्हणाले, स्थनिक स्वराज संस्था निवडणुका घ्या, अशी आम्ही सरकारला मागणी केली. पण सरकार भीतीने घेत नाही. ५६ इंच त्यांना कळली आहे. सरकारला विधानसभेतही मागणी केली पण सरकार वेळ काढत आहे. कारण भाजपला लोकांचे त्यांच्याबद्दलचे मत कळले आहे. कर्नाटकचे लोण सर्वत्र पसरले आहे. भाजपचे पाणीपत होईल. त्यामुळे भाजप निवडणुकीपासून पळत असल्याचा आरोप त्यांनी केला. सव्वा वर्ष झालं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेतल्या नाही. आता ऑक्टोबरमध्ये फार लवकर घेत आहेत, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला. ओबीसीच्या आरणाच्या मुद्यावर सरकारने तातडीने बाजू मांडली नाही. सत्ता द्या ओबीसींचा निर्णय २४ तासात घेतो, असे तुम्हीच म्हणाले होते, अशी आठवणही त्यांनी फडणवीस यांना करून दिली.

लोकसभेसाठी ९ सदस्यीय समिती

- लोकसभेच्या निवडणुका एकत्रित लढण्याबाबत महाविकास आघाडीत प्राथमिक चर्चा झाली आहे. आता तीनही पक्षांचे प्रत्येकी तीन सदस्य अशी एकूण ९ लोकांची कमिटी बनणार आहे. त्यात लोकसभानिहाय चर्चा केली जाईल. १५ ते २० दिवसात याबाबतचा अहवाल येईल. त्यानंतर निर्णय घेऊ, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले