शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोले म्हणाले, समीर वानखेडे 'पोपट'.. त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2022 16:12 IST

देश वाचवणं आता काँग्रेसची जबाबदारी आहे आणि त्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देण्याचं काम या शिबिरातून होईल, असे पटोले म्हणाले.

नागपूर : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यनला मोठा दिलासा मिळाला आहे. आर्यन खानला कोर्टाकडून क्लीन चिट मिळाली आहे. तर, या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे तत्कालीन मुंबई प्रमुख समीर वानखेडे यांच्याविरोधात चौकशी सुरू होणार असल्याची माहिती आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

केंद्रीय तपास यंत्रणेचा सातत्याने दुरुपयोग होत आहे, हे आम्ही आधीपासूनच सांगत आहोत. आर्यन खान प्रकरणातही काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली होती. समीर वानखेडेवर कुठलीही कारवाई होणार नाही. कारण, वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणेतील एक पोपट होता आणि या पोपटावर कुठलीही कारवाई होणार नाही हे आपल्याला येत्या काळात दिसून येईल, असे पटोले म्हणाले.

सोशल मीडिया सेशन

भाजप दररोज ४० कोटी रुपये खर्च करुन देशभरात  जे काम करत आहे ते काम काँग्रेस करणार नाहीय वस्तूस्थिती समाजासमोर मांडणं ही भूमिक काँग्रेसची सातत्याने राहिली आहे. काँग्रेसचे जे कार्यकर्ते सोशल मीडियात काम करत आहेत त्यांना आणखी ट्रेनिंग देणं, अलिकडच्या स्पर्धेत कसं टिकता येईल यावर देशव्यापी काँग्रेस कार्यकर्त्यांचं सेशन ठेवलं आहे, असे पटोले यांनी सांगितलं.

राणा दाम्पत्याकडून आज नागपुरात हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे. याबाबत प्रश्न विचारला असता हनुमान चालीसा हा आस्थेचा विषय आहे, मी हनुमान चालीसा वाचून घरून निघतो. याचं राजकारण कशासाठी ?  तसेच, देशात महागाईसारखे प्रश्न असताना धार्मिक मुद्द्यावरुन राजकारण सुरू आहे, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसAryan Khanआर्यन खानSameer Wankhedeसमीर वानखेडेBJPभाजपा