नाना पटोले व सुनील केदार यांचे भर पावसात सायकल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 14:11 IST2021-07-08T14:02:34+5:302021-07-08T14:11:08+5:30
Nagpur News गेल्या काही दिवसांपासून शंभरी पार केलेल्या पेट्रोलच्या दरवाढीचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी गुरूवारी सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसात सायकली चालवून आपला निषेध नोंदवला.

नाना पटोले व सुनील केदार यांचे भर पावसात सायकल आंदोलन
विशाल महाकाळकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गेल्या काही दिवसांपासून शंभरी पार केलेल्या पेट्रोलच्या दरवाढीचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी गुरूवारी सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसात सायकली चालवून आपला निषेध नोंदवला. त्यांचे हे अनोखे सायकल आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनी पावसात भिजत एकच गर्दी केली होती.
गुरुवारी दुपारी १२ वा. संविधान चौकातून या आंदोलनाला सुरुवात झाली. पेट्रोलदरवाढीच्या निषेधार्थ घोषणा देत नाना पटोले व सुनील केदार यांनी आपला सायकलमार्च चालू केला. यावेळी विकास ठाकरे, अभिजित वंजारी व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.