श्री सुमतीनाथ स्वामी जैन मंदीर चौकाचे नामकरण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST2021-09-14T04:12:00+5:302021-09-14T04:12:00+5:30

नागपूर : देशभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या रामदासपेठ येथील श्री सुमतीनाथ स्वामी जैन मंदीर चौकाचे नामकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ...

Naming of Shri Sumatinath Swami Jain Mandir Chowk () | श्री सुमतीनाथ स्वामी जैन मंदीर चौकाचे नामकरण ()

श्री सुमतीनाथ स्वामी जैन मंदीर चौकाचे नामकरण ()

नागपूर : देशभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या रामदासपेठ येथील श्री सुमतीनाथ स्वामी जैन मंदीर चौकाचे नामकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी आचार्य श्री हंस किर्ती सूरिश्वर महाराज, आचार्य श्री भव्य किर्ती सूरिश्वर महाराज, आचार्य श्री आत्मदृष्टी महाराज, उपमहापौर मनिषा धावडे, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर, नगरसेवक सुनील हिरणवार, संजय बंगाले, रूपा राय, किर्तीदा अजमेरा व साधूगण उपस्थित होते. मनपाने या चौकाचे श्री सुमतीनाथ स्वामी जैन मंदीर चौक असे नामकरणाला मंजुरी दिली आहे.

लहान मुलांवर चांगले संस्कार करा, पाश्च्यात्य शिक्षणा ऐवजी भारतीय व जैन संस्कृतीचे शिक्षण मिळेल यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करा, यासाठी शाळा, मंदीर, रूग्णालय व सांस्कृतिक हॉल निर्माण करण्याचे आवाहन आचार्य महाराजांनी आपल्या मार्गदर्शनात केले. नितीन गडकरी यांनी यासाठी सरकारकडून मदत करण्याचे आश्वासन दिले.

जैन मंदिराची स्थापना आचार्य परमपूज्य राजयश सूरिश्वर यांनी १९९ मध्ये केली होती. श्री सुमतीनाथ स्वामी यांच्या दर्शनासाठी येथे दरवर्षी देशभरातील हजारो भाविक येतात. साधू संतासाठी येथे चार्तुमासासाठी उपाश्रय हॉल निर्माण करण्यात आला आहे. दरवर्षी हजारो साधू-साध्वी भगवंत उपदेश करतात. येथे शुध्द जैन भोजन शाळा सुरू असूर दररोज शेकडो लोक याचा लाभ घेतात.

प्रस्ताविक संघाचे अध्यक्ष निखील कुसूमगर यांनी केले. संचालन उपाध्यक्ष जयंतीभाई पुनमिया यांनी केले तर आभार उपाध्यक्ष श्रीपाल कोठारी यांनी मानले. सचिव विनोद फतेपुरीया यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संखयेने उपस्थित होते.

Web Title: Naming of Shri Sumatinath Swami Jain Mandir Chowk ()