शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कर्जमाफीच्या लाभार्थ्यांमध्ये आमदारांसह शिक्षकांचीही नावे; सरकारची फजिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 10:50 AM

कर्जमाफीच्या लाभार्थ्यांमध्ये आमदारही सामील आहेत. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी शुक्रवारी विधानसभेत स्वत: ही माहिती देत राज्य सरकारच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देशिवसेनेच्या आमदाराचा विधानसभेत खुलासाआयटी विभागाचा घोळ असल्याचे स्पष्टीकरणविद्यार्थिनीला मिळाला लाभ

आॅनलाईन लोकमतनागपूर : कर्जमाफीच्या लाभार्थ्यांमध्ये आमदारही सामील आहेत. शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी शुक्रवारी विधानसभेत स्वत: ही माहिती देत राज्य सरकारच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याची मागणी केली.उल्लेखनीय म्हणजे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत देण्यात आलेल्या कर्जमाफीचे आकडे जाहीर केले. त्यांच्यानुसार राज्यात आतापर्यंत ६९ लाख खातेधारकांपैकी ४३ लाख खातेधारकांना २० हजार ७३४ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. शुक्रवारी आबीटकर यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे विधानसभेत सांगितले की, कोल्हापूर येथील त्यांच्या सोसायटीच्या अध्यक्षांनी आज सकाळी फोनवर माहिती दिली, की त्यांचे नाव लाभार्थीच्या यादीमध्ये आहे. त्यांच्या खात्यात २५ हजार रुपये जमा झाले आहेत.दरम्यान आ. आबीटकर यांनी सभागृहाबाहेरही पत्रकारांशी बोलताना हा मुद्दा निदर्शनास आणून दिला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून यादी पाठवली जाते. यात माझे नाव कसे आले? मलाच माहिती नाही. आयटी विभागाने हा सर्व घोळ केला आहे. माझ्या ओळखीच्या चार शिक्षकांचाही या यादीत समावेश आहे. त्यांची यादीही त्यांनी दाखवली. त्यांचा या यादीशी काहीही संबंध नाही. असे हजारो लाभार्थीया यादीत असू शकतात, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून शिवसेना याचा पाठपुरावा करीत आहे. परंतु असा घोळ होत असेल तर खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कसा मिळणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सरकारची फजितीसरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनीज शुक्रवारी सरकारची फजिती केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा शिवसेना ‘बॅकफूट’वर आली. पक्षाचे आमदार सुनील प्रभू हे सरकारच्या बजावासाठी पुढे आले, ते म्हणाले, प्रकाश आबीटकर या नावाचे एकापेक्षा अधिक लोकही राहू शकतात. आबीटकर यांनी ही माहिती केवळ सरकारला सचेत करण्यासाठी दिली आहे.सुतार यांच्या संयुक्त कर्जखात्यामध्ये आबिटकर यांचे नावआमदार प्रकाश आबिटकर यांचे कर्जखाते कर्जमाफीतील २५,००० रुपये प्रोत्साहन अनुदानाच्या यादीत आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्याबाबतची वस्तुस्थिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी निदर्शनास आणून दिली आहे. आ. प्रकाश आबिटकर यांचा कर्जमाफीसाठी अर्ज नाही. आबिटकर या आडनावाचे एकूण ३७ अर्ज आहेत. प्रकाश आबिटकर या नावाने सुध्दा एक अर्ज आहे पण तो आमदार महोदयांचा नाही, ते खाते बँक आॅफ इंडियातील आहे.मातोश्रीवर यादीची तपासणीविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ही तपासण्यासाठी मातोश्रीवर जाणार की काय असे वाटत असल्याचे सांगत लाभार्थाी शेतकऱ्यांची यादी सरकारच्या वेबसाईटवर सार्वजनिक करण्याची मागणी करीत सरकारला चिमटा काढला.१९ ला प्रमाणपत्र, ८ ला कर्जमाफी नाहीराज्य शासनाने कर्जमाफी जाहीर केली. ऐन दिवाळीमध्ये प्रमाणपत्र वाटले. बुलडाणा येथे १९ शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटण्यात आले. त्यापैकी ८ शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळालेली नाही. तसेच त्यापैकी २ शेतकऱ्यांचे नाव तर ग्रीन लिस्टमध्ये सुद्धा नाही, ही बाब काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे निदर्शनास आणली.

विद्यार्थिनीलाही मिळाला लाभविरोधी पक्षाकडून सादर केलेल्या चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, दहावीच्या एका विद्यार्थिनीच्या खात्यातही कर्जमाफीचे पैसे जमा झाले आहेत.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Politicsराजकारण