शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या पोलीस आयुक्तपदासाठी सक्सेना, सिंघल यांचे नाव

By नरेश डोंगरे | Updated: October 3, 2023 21:44 IST

अनुपकुमार आणि रामानंदही चर्चेत : अमितेशकुमार यांची ठाण्यात वर्णी; अपवादात्मक स्थितीत मुंबई किंवा पुण्यात महत्वाची जबाबदारी : लवकरच होणार घोषणा

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नवरात्र दसरा, दिवाळीच्या बंदोबस्ताची व्यूहरचना करण्यात व्यस्त असलेल्या महाराष्ट्राच्या पोलीस दलात गेल्या काही तासांपासून नवनियुक्ती अन् बदल्यांचे वारे जोराने वाहू लागले आहे. नागपूर पोलीस आयुक्तांसह ठिकठिकाणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषयही शिर्षस्थ पातळीवर अग्रस्थानी आला आहे. पुढच्या काही तासातच या संबंधाने निर्णय होणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी (डीजीपी) ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा तेवढी बाकी असल्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती आहे. शुक्ला डीजीपी झाल्यास राज्य पोलीस दलाच्या सर्वोच्चपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी ठरणार आहेत. शुक्ला यांच्या नियुक्तीसारखाच महत्वाचा बदल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमटाऊन आणि राज्याच्या उपराजधानीतही अपेक्षित आहे. येथील पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा सेवाकाळ वर्षभरापूर्वीच पूर्ण झाला. येथे ते सप्टेंबर २०२० ला रुजू झाले होते. नागपूरच्या ईतिहासात सर्वाधिक ३७ महिने पोलीस आयुक्तपदी राहण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा झाला आहे. त्यामुळे त्यांची आता नागपुरातून बदली होणार आहे. सूत्रांच्या मते त्यांना ठाणे येथे प्रमुखपदी नेमले जाणार आहे. त्यात काही अडचण आल्यास अमितेशकुमार यांना मुंबई अथवा पुण्यात महत्वाच्या जागी नियुक्त केले जाणार आहे. त्यांच्या रिक्त पदावर अर्थात नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून संजय सक्सेना यांची नियुक्ती होणार असल्याचे सांगितले जाते. राज्यातील महत्वाचे आणि दुसऱ्या क्रमांकाचे पद मानले जाणारे एडीजी लॉ अॅन्ड ऑर्डर म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी नागपुरात सहपोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळताना अनेक धडाकेबाज कारवाई केल्या होत्या. सक्सेना यांच्या नंतर संजय सिंघल आणि अनुपकुमार यांचीही नावे आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांनी नागपुरात पोलीस उपायुक्त म्हणून चांगले काम केले आहे. सक्सेना, सिंघल आणि अनुपकुमार यांच्यासोबतच नागपूरचे संभाव्य पोलीस आयुक्त म्हणून सुनील रामानंद यांचेही नाव चर्चेत आहे.राजधानी - उपराजधानीतील घोषणा पाठोपाठच

पोलीस महासंचालकपदाची अधिकृत घोषणा झाल्याच्या पाठोपाठच उपराजधानीतील पोलीस आयुक्तांचीही घोषणा होण्याची अपेक्षा आहे. या शिवायही राज्यातील अन्य काही महत्वाच्या पदावर असलेल्यां आयपीएस अधिकाऱ्यांच्या फेरबदलाची घोषणा एकसाथ होणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :Policeपोलिस