दूरदर्शनच्या नावावर गंडा
By Admin | Updated: September 19, 2015 03:50 IST2015-09-19T03:50:03+5:302015-09-19T03:50:03+5:30
भारत सरकारच्या प्रसार भारती विभागाच्या (दूरदर्शन) नावावर बोगस जाहिरात प्रसिद्ध करू न विदर्भातील अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून...

दूरदर्शनच्या नावावर गंडा
बोगस जाहिरात : नोकरीच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक
नागपूर : भारत सरकारच्या प्रसार भारती विभागाच्या (दूरदर्शन) नावावर बोगस जाहिरात प्रसिद्ध करू न विदर्भातील अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यात अनेक बेरोजगारांना हजारो रुपयांनी गंडा घालण्यात आला आहे. यासंबंधी अलीकडेच भंडारा जिल्ह्यातील वासेरा येथील सौरभ झंजाळ या बेरोजगार तरुणाने ‘लोकमत’ कडे तक्रार करू न या संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड केला आहे.
सौरभ हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. इतर तरुणांप्रमाणे त्यानेही वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात पाहून दूरदर्शनवरील ‘किसान पत्रकार’ पदासाठी अर्ज केला. त्यावर त्याला संबंधित व्यक्तीने भारत सरकार व दूरदर्शनचा लोगो असलेल्या लेटरहेडवर संचालक सुरेश पाटील यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पत्र पाठवून १२ हजार ५०० रुपये बँकेत जमा करण्यास सांगितले. ते नियुक्ती पत्र पाहून सौरभ हा कमालीचा आनंदित झाला. त्यामुळे त्याने कोणतीही चौकशी न करताना ८ सप्टेबर २०१५ रोजी भंडारा जिल्ह्यातील जाम येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत एम. आर. राजेशकुमार या नावावरील बँक खाते क्र. २०२७९१३९५५९ यावर १२ हजार ५०० रुपये जमा केले. तत्पूर्वी सौरभला नियुक्तीपत्रसह पाठविलेल्या दुसऱ्या पत्रात त्याला २५ हजार ५०० रुपये प्रतिमाह वेतन मिळणार असल्याचे आमिष दाखवून नि:शुल्क आवास, कॅमेरा, मोटरसायकल, मोबाईल फोन, इंटरनेट, वाहनभत्ता, एटीएम, मोफत आरोग्य सुविधा व प्रशिक्षणाला जाण्यासाठी रेल्वे तिकीट देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले होते. मात्र काहीच दिवसांत सौरभला मोबाईल क्र. ०७६३३४७१०३८ यावरू न फोन आला आणि राजेशकुमार या व्यक्तींच्या खात्यावर पुन्हा १५ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. यावेळी मात्र सौरभने पैसे न भरता थेट नागपूर येथील दूरदर्शनच्या कार्यालयात धाव घेतली.