शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरच्या मालमत्ता नोकरांच्या नावाने, प्राप्तिकरचे छापे तिसऱ्या दिवशीही सुरूच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 05:36 IST

नागपुरातील सहा पैकी पाच बिल्डरांवरील प्राप्तिकर खात्याचे छापे गुरुवारी तिस-या दिवशीही सुरू होते.

नागपूर -  नागपुरातील सहा पैकी पाच बिल्डरांवरील प्राप्तिकर खात्याचे छापे गुरुवारी तिस-या दिवशीही सुरू होते. काल उशिरा रात्री अधिकाऱ्यांनी अ‍ॅड. चंद्रकांत पद्मावार यांच्याकडील कारवाई पूर्ण केली, या सहा बिल्डरांनी केलेले बेनामी व्यवहार २०० कोटींच्या घरात असावे, अशी माहिती सूत्रांनी दिली.प्राप्तिकर अधिकाºयांनी आज कागदपत्रांची पडताळणी केली व उरलेले तीन बँक लॉकर्सही उघडले.या लॉकरमधून जवळपास दोनकिलो सोन्याचे दागिने वबेनामी संपत्तीची कागदपत्रे सापडले. महत्त्वाचे म्हणजे, या पाच बिल्डरपैकी एका बिल्डरने दोन जमिनीआपल्या दोन नोकरांच्या नावाने खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या मालमत्तांची एकूण किंमत अंदाजे २० कोटी आहे. बेनामी ट्रान्झॅक्शन (प्रोहिबिशन) अ‍ॅक्ट २०१६ या कायद्यानुसार बेनामी मालमत्ता सरकारजमा करण्याचा अधिकार प्राप्तिकर विभागाला आहे. अधिकाºयांनी या दोन्ही मालमत्ता ताब्यात घेतल्या आहे व दोन्ही नोकरांची चौकशी सुरू केली आहे.आजच्या कारवाईमध्ये अतुल यमसनवार यांच्या आॅरेंज सिटी हाऊसिंग फायनान्सचा संचालक असलेल्या धंतोलीतील एका प्रख्यात बिल्डरचेही नाव समोर आले आहे. हा बिल्डर हा इतर सहा कंपन्यांचाही संचालक असून राजकीय वर्तुळात सक्रिय आहे. या बिल्डरचे यमसनवार यांच्याशी काय व्यावसायिक संबंध आहेत याचीही चौकशी प्राप्तिकर अधिकाºयांनी सुरू केल्याची माहिती सूत्रानी दिली.सहाही बिल्डरांच्या घरात प्रोटेक्टड युनिटप्राप्तिकर अधिकाºयांनी या सहाही बिल्डरांच्या घरात पी. यू. (प्रोटेक्टड युनिट) तयार केले आहेत. पी. यू. मध्ये घरातील एका खोलील जप्त केलेले दस्तावेज व इतर पुरावे ठेवले जातात व त्याला प्राप्तिकर खात्याचे अधिकारी कुलूप लावतात. या खोलीत केव्हाही येण्या-जाण्याचे अधिकार प्राप्तिकर खात्याच्या अधिकाºयांना असतात. प्रोटेक्टेड युनिट ही शेवटची कारवाई समजली जाते त्यामुळे या पाचही बिल्डरांवरील छापे आज उशिरा रात्रीपर्यंत संपण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूरIncome Taxइन्कम टॅक्स