शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास विभागाच्या आदेशाला नागपूर जि.प.चा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:08 IST

ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील थकीत वीज बिल ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भरावे, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढले आहे. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती बघता, आम्ही पथदिव्यांचे थकीत वीज बिल भरणार नाही, असा निर्णय जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देअध्यक्ष म्हणतात, थकीत बिल भरणार नाही : निर्णय मागे घेण्याची मागणी

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर. ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील थकीत वीज बिल ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भरावे, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढले आहे. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती बघता, आम्ही पथदिव्यांचे थकीत वीज बिल भरणार नाही, असा निर्णय जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी घेतला आहे. ग्रामविकास विभागाने हे निर्देश मागे घ्यावे, अशी मागणी अध्यक्ष सावरकर यांनी केली आहे.राज्यात ग्राम पंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांचे बिल शासनस्तरावरून भरले जाते. हे वीज बिल ग्रामपंचायतीकडून भरले जात नव्हते. मध्यंतरी या पथदिव्याच्या थकीत वीज बिलामुळे महावितरणने अनेक ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची वीज तोडली होती. मोठा बोभाटा झाल्यानंतर वीज जोडणी पूर्ववत केली होती. आता पुन्हा शासनाने पत्र काढल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामपंचायतीसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. पथदिव्यांच्या थकीत वीज बिलाचा प्रश्न राज्यभर आहे. राज्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांची सुमारे ३०० कोटींची वीज बिले शासनस्तरावर थकीत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना अतितात्काळ म्हणून पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांची बरीचशी वीज बिले थकीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या वीज बिलासाठी महावितरण विद्युत कंपनी वीज जोडणी खंडित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी (ग्रामपंचायत) त्यांच्या स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून थकीत बिले भरावी.याबाबत जि.प.अध्यक्षा निशा सावरकर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन स्थिती लक्षात आणून दिली. यापूर्वी या देयकांचे शोधन शासन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ऊर्जामंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेणार, असे आश्वासन दिल्याची माहिती जि.प.अध्यक्षा निशा सावरकर यांनी दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूर