शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सुपारी व्यावसायिकही आयकर विभागाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:15 IST

मिरची-मसाला निर्यातदार प्रकाश वाधवानी यांचे निवास आणि प्रतिष्ठानांवर आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर आता वाधवानी यांच्याशी संबंधित व्यापाऱ्यांची विचारपूस केली जात आहे. आयकर विभाग वाधवानी यांच्या इतवारी येथील लॉकर्सचा लाभ घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर नजर ठेवून आहे. या अंतर्गत गुरुवारी अशा जवळपास १५ व्यापाऱ्यांची आयकर विभागाने कसून विचारपूस केल्याची माहिती आहे. दुसरीकडे इतवारी-मस्कासाथ येथील संबंधित सुपारी व्यापाऱ्यांसह वाधवानी यांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये माल घेऊन येणाऱ्या ट्रान्सपोर्टरही आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्दे१५ व्यापाऱ्यांची आयकर विभागाकडून कसून विचारपूस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिरची-मसाला निर्यातदार प्रकाश वाधवानी यांचे निवास आणि प्रतिष्ठानांवर आयकर विभागाने केलेल्या कारवाईनंतर आता वाधवानी यांच्याशी संबंधित व्यापाऱ्यांची विचारपूस केली जात आहे. आयकर विभाग वाधवानी यांच्या इतवारी येथील लॉकर्सचा लाभ घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर नजर ठेवून आहे. या अंतर्गत गुरुवारी अशा जवळपास १५ व्यापाऱ्यांची आयकर विभागाने कसून विचारपूस केल्याची माहिती आहे. दुसरीकडे इतवारी-मस्कासाथ येथील संबंधित सुपारी व्यापाऱ्यांसह वाधवानी यांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये माल घेऊन येणाऱ्या ट्रान्सपोर्टरही आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे. येणाऱ्या काही दिवसात सुपारी व्यावसायिक आणि ट्रान्सपोर्टरवरही आयकर विभागाची मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कॅप्टन नावाने कुख्यात असलेला सुपारी व्यावसायिकही यानिमित्ताने तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. मध्य भारतातील सर्वात मोठा सडक्या सुपारीचा व्यावसायिक म्हणून कॅप्टन कुख्यात आहे. तो नागपुरातून विविध प्रांतात सडलेल्या सुपारीवर प्रक्रिया करून ती घातक सुपारी वेगवेगळ्या राज्यात विकायला पाठवतो. त्याला त्याची कुणकुण लागल्याने त्याने गेल्या दोन दिवसात करोडो रुपयांची सडकी सुपारी आणि कोट्यवधीचा अन्य माल इकडे-तिकडे केल्याची संबंधित वर्तुळात चर्चा आहे. पोलिसांनीही त्याच्याकडे लक्ष वेधले आहे. यासोबतच अन्य निकृष्ट सुपारी व्यावसायिकांमध्येही खळबळ निर्माण झाली आहे. प्रत्येकजण आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी धावपळ करीत आहे. गुरुवारीसुद्धा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकाश वाधवानी यांची विचारपूस केली.

टॅग्स :Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयraidधाड