शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नागपूरच्या सोनाली पाटमासेची बाजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:13 IST

मालवण येथील चिवला ब्रिजवर झालेल्या दहाव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नागपूरची कन्या सोनाली मनोहर पाटमासे हिने बाजी मारून सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकावला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : मालवण येथील चिवला ब्रिजवर झालेल्या दहाव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नागपूरची कन्या सोनाली मनोहर पाटमासे हिने बाजी मारून सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकावला आहे. सोनाली पाटमासे हिने अंबाझरी तलाव येथे भोजराज मिश्रा आणि कामगार कल्याण केंद्र येथे अमित यादव यांच्या देखरेखीत सराव करून हा विजय मिळविला आहे. सागरी किनारा नसलेल्या नागपूरच्या सोनालीने कोकणातील अरबी समुद्राला आव्हान देत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा जोशी जलतरण संघटनेच्यावतीने मालवणच्या चिवला बीचवर १५ डिसेंबरला राष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत २५ ते ३५ वयोगटात सोनालीने तीन किलोमिटर अंतर पोहून तिसरे स्थान पटकावून कांस्यपदक मिळविले. स्पर्धेत नागपूरच्या जलतरणपटूंचाही समावेश होता. त्यांनी सुद्धा उत्कृष्ट कामगिरी बजावली. खाºया पाण्याची तमा न बाळगता खवळलेल्या समुद्रातून तीन किलोमीटर अंतर अवघ्या ४९ मिनिटे १५ सेकंदात पार करीत तिने किनारा गाठला. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पुरस्कार, पदक, बॅग, टॉवेल, जर्सी आणि भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले. विजेत्या स्पर्धकांचे गणेश ढोले, निलेश गुजर, प्रभाकर साठे, कृष्णा बेसले, आशिष सूर्यवंशी यांनी कौतुक केले आहे. नागपूरला प्रियदर्शिनी येथे अ‍ॅक्वाथ्लॉन चौथ्या जलतरण स्पर्धेत स्विमींग प्लस रनिंगमध्ये दुसरा क्रमांक घेऊन तिने सिल्व्हर मेडल मिळविले.

टॅग्स :Swimmingपोहणेnagpurनागपूर