शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्विकासाचे मॉडेल ठरणार नागपूरचे स्मार्ट रेल्वे स्टेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:35 IST

अमृत भारत स्टेशन योजना : आधुनिक सोयी-सुविधांवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या पुनर्विकासाच्या कामांमुळे नागपूरचेरेल्वे स्थानक 'मॉडेल' ठरणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातीलच नव्हे तर देशातील एक प्रमुख रेल्वे स्थानक म्हणून नागपूर स्थानकाचे महत्त्व आहे. या स्थानकावरून देशाच्या चारही दिशांना गाड्या जातात आणि येतात. त्यामुळे येथे वर्षातील ३६५ दिवस प्रवाशांची २४ तास वर्दळ असते. या स्थानकाचे पुनर्विकासाचे काम धडाक्यात सुरू आहे. येथे प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. 

लाइन नंबर १८ आणि १९ दरम्यान उभारण्यात येणाऱ्या एलिवेटेड कंकोर्सच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची वाहतूक अधिक सुलभ आणि स्वतंत्र होणार आहे. जुन्या इमारती पाडून त्या बदल्यात पूर्व आणि पश्चिम दिशेला नवीन स्टेशन इमारतींचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीचे जतन तसेच संवर्धन करण्यावर कटाक्षाने भर दिला जात आहे. त्यानुसार, इमारतीचे बाह्य भाग स्वच्छ करून, वॉटरप्रूफिंग, अंतर्गत सजावट तसेच स्थापत्य लायटिंगवर विशेष लक्ष देऊन या इमारतीचा वारसा जपला जात आहे.

बाह्यसौंदर्याकडेही लक्षइमारतीच्या आतल्या भागासोबतच बाहेरच्या भागाचे सौंदर्य खुलविण्यावरही विशेष लक्ष दिले जात आहे. कलात्मक भित्तीचित्रे, डिजिटल साइन बोर्डस् तसेच कलाकुसरीतून बाह्य भाग देखणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

...पण नेमके कधी होणार पूर्ण ?सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर नागपूरचे हे रेल्वे स्थानक सर्व प्रवाशांसाठी जगातल्या सर्वोत्कृष्ट सुविधा आणि सुलभ वाहतूक प्रदान करणारे एक मॉडेल स्थानक म्हणून ओळखले जाईल, असा दावा रेल्वे प्रशासन दर दोन-तीन महिन्यांतून प्रसिद्धीपत्रकातून करीत असते. मात्र, हे काम नेमके कधी पूर्ण होणार, नियोजित मुदतीनुसार कामाची प्रगती आहे की नाही, त्याची मात्र स्पष्ट माहिती दिली जात नाही.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर