शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांना देण्यासाठी औषधेच नाहीत; ४३५ रुग्णांचा जीव आला धोक्यात !

By सुमेध वाघमार | Updated: February 3, 2026 14:47 IST

Nagpur : उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालय, जे विदर्भासह लगतच्या राज्यांतील गरीब मनोरुग्णांसाठी आशेचा शेवटचा किरण मानले जाते, ते सध्या स्वतःच 'व्हेंटिलेटर'वर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

सुमेध वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालय, जे विदर्भासह लगतच्या राज्यांतील गरीब मनोरुग्णांसाठी आशेचा शेवटचा किरण मानले जाते, ते सध्या स्वतःच 'व्हेंटिलेटर'वर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या दीड वर्षापासून मुंबईच्या आरोग्य विभागाकडून औषधांचा पुरवठाच झालेला नाही. परिणामी, भरती असलेल्या ४३५ रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. शिवाय, दररोज येणारे २५० बाह्यरुग्णांवर उपचार करणे मनोरुग्णालय प्रशासनाला अडचणीचे झाले आहे. मनोरुग्णांवर उपचार करताना औषधांमध्ये खंड पडणे म्हणजे आजार वाढविणे असे असते. मात्र, आरोग्य विभागाचा लालफितीचा कारभार आणि अपुऱ्या निधीमुळे बहुसंख्य औषधसाठा पूर्णपणे संपला आहे. 'ओलान्झापाइन 'पासून ते 'रिस्पेरिडोन' सारखी महत्त्वाची औषधे नसल्याने रुग्णांचा आजार कमी होण्याऐवजी तो अधिक बळावत आहे. औषधे लिहून देणे नियमबाह्य ठरत असल्याने डॉक्टर हतबल आहेत.

या महत्त्वाच्या औषधांचा 'ठणठणाट'

ओलान्झापाइनः स्किझोफ्रेनिया आणि तीव्र नैराश्यासाठी अनिवार्य.अॅमिट्रिप्टिलीन : अत्यंत उदास आणि आत्महत्येचे विचार येतात तेव्हा आवश्यक.रिस्पेरिडोन : आक्रमक हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक,सोडियम व्हॅल्प्रोएटः फिट्स आणि मेंदूला शांत ठेवण्यासाठी महत्त्वाचे.पॅसिटेन: औषधांचे साईड इफेक्ट्स रोखण्यासाठी गरजेचे.टिनिडाझोल : संसर्ग रोखणारे अँटी- बायोटिक, सारख्या महत्त्वाच्या औषधींचा ठणठणाट आहे.

औषधे अचानक बंद केल्यास जिवाला धोका

मानसोपचारतज्ज्ञाच्या मते, ओलान्झापाइनसारखी औषधे अचानक बंद केल्यास रुग्णामध्ये 'विथड्रॉवल सिम्पटम्स' दिसू शकतात. यामुळे रुग्णाचे मानसिक संतुलन अधिक बिघडणे, तो स्वतःला किंवा इतरांना इजा करणे किंवा आत्महत्येसारखे पाऊल उचलणे, अशा घटना घडू शकतात. सरकार या धोक्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल रुग्णांचे नातेवाईक विचारत आहेत.

दीड वर्षांपासून उधारीवर औषधी

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मागील दीड वर्षांपासून आरोग्य विभागाकडून औषधी मिळाले नसल्याने रुग्णालय प्रशासनाने विदर्भातील विविध शासकीय रुग्णालयातून उधारीवर औषधी घेतल्या आहेत. यासंदर्भात आरोग्य सेवा विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उत्तर दिले नाही.

"जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून स्थानिक पातळीवर औषधी खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. शिवाय, वरिष्ठांनाही औषधीच्या तुटवड्याबाबत माहिती दिली असून लवकरच त्यांच्याकडूनही औषधी उपलब्ध होणार आहेत."- डॉ. सतीश हुमणे, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur mental hospital faces drug shortage, endangering 435 patients.

Web Summary : Nagpur's regional mental hospital is facing a severe drug shortage, jeopardizing the lives of 435 patients. Essential medicines are unavailable, exacerbating patient conditions. The hospital is struggling to treat both inpatients and outpatients due to lack of supplies.
टॅग्स :nagpurनागपूरmental hospitalमनोरूग्णालयHealthआरोग्य