शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

मिस इंडियाच्या घरी सापडला नागपूरचा कुख्यात गुंड सुमित ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 15:48 IST

कुख्यात गुंड सुमित ठाकूरला त्याची गर्लफ्रेंड मिस इंडिया उर्वशी साखरेच्या घरातून अटक करण्यात आली आहे. सुमित पिन्नू पांडेवर गोळीबाराच्या प्रकरणात सव्वा महिन्यापासून पोलिसांना हवा होता. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी उर्वशीच्या जाफरनगर येथील घरावर छापा टाकून सुमितला अटक केली.

ठळक मुद्देपोलिसांपासून बचावासाठी लपला आलमारीत : सव्वा महिन्यानंतर अटक, पिन्नू पांडेवरील गोळीबारात होता फरार

नागपूर : कुख्यात गुंड सुमित ठाकूरला त्याची गर्लफ्रेंड मिस इंडिया उर्वशी साखरेच्या घरातून अटक करण्यात आली आहे. सुमित पिन्नू पांडेवरील गोळीबाराच्या प्रकरणात सव्वा महिन्यापासून पोलिसांना हवा होता. शुक्रवारी (3ऑगस्ट) सायंकाळी पोलिसांनी उर्वशीच्या जाफरनगर येथील घरावर छापा टाकून सुमितला अटक केली. सुमितने साथीदारांच्या मदतीने 26 जूनला दुपारी गिट्टीखदान ठाण्यांतर्गत पोलीस मुख्यालयाजवळील अवस्थीनगर चौकाजवळ पिन्नू पांडेवर गोळीबार केला होता.

या घटनेत पिन्नू पांडे गंभीर जखमी झाला होता. या घटनेत रस्त्यावरून जाणारा नागरिक आणि अल्पवयीन जखमी झाले होते. पोलिसांनी सुमितच्या गुर्गे उजैर ऊर्फ उर्जी क्राईम आणि पीयूष वानखेडेला अटक केली होती. सुमित आणि त्याचे इतर साथीदार पोलिसांच्या हाती लागत नव्हते. या प्रकरणात पोलिसांची फजिती होत होती. सुमितची काही काळापासून मिस इंडिया २०१८ उर्वशी साखरे हिच्याशी मैत्री आहे.

पोलिसांना सुमित उर्वशीला भेटायला आल्याची माहिती मिळाली. पोलीस उर्वशीवर काही दिवसांपासून पाळत ठेवून होते. सूत्रांनुसार गुरुवारी सायंकाळी सुमित उर्वशीच्या घरी आला. घराच्या पहिल्या माळ्यावर उर्वशीची बेडरुम आहे. खाली आईवडील राहतात. पोलिसांना सुमित उर्वशीच्या बेडरुममध्ये असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी शुक्रवारी महिला अधिकाऱ्यांच्या मदतीने योजना आखून उर्वशीच्या घरावर छापा टाकला. पोलीस थेट उर्वशीच्या बेडरुममध्ये पोहोचले. त्यांनी उर्वशीच्या घराला आधीपासून घेराव घातला होता. दरवाजा वाजल्यानंतर उर्वशीने दार उघडले. बेडरुमची तपासणी केली असता एका आलमारीत सुमित लपल्याचे पोलिसांना दिसले. उर्वशीने तो शुक्रवारी रात्री भेटण्यासाठी आल्याची कबुली दिली. पोलिसांनी सुमितला अटक करून गुन्हे शाखेत आणले.

प्राथमिक चौकशीत त्याने पिन्नू पांडेवर गोळीबाराच्या घटनेत समावेश असल्याचा इन्कार केला. सूत्रांनुसार सुमितची दीड वर्षांपासून उर्वशीसोबत मैत्री आहे. एप्रिल महिन्यात मिस इंडिया झाल्यानंतर उर्वशी रात्रभरात प्रसिद्धीच्या झोतात आली. सुमितची शहरातील गुन्हेगारी जगतात दहशत आहे. काही काळापूर्वी नेत्यांचेही त्याला संरक्षण मिळाले होते. सुमित आणि त्याच्या कुटुंबीयांना मकोकात जमानत मिळालेली आहे. या प्रकरणातून त्यांनी जमानतीच्या अटीचेही उल्लंघन केले आहे. यामुळे पोलीस त्यांची जमानत रद्द करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध कारवाई करून त्यांना वर्धा येथे सोडले होते.

ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आंचल मुदगल, राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, ज्ञानेश्वर बेदोडकर, उपनिरीक्षक दत्ता पेंडकर, आरजकुमार त्रिपाठी, मंगला मोकासे, हवालदार प्रकाश वानखेडे, रवींद्र गावंडे, प्रशांत देशमुख, शैलेश ठवरे, शत्रुघ्न कडु, विजय लेकुरवाळे, निनाजी तायडे, महेश कुलसंगे, गंजीत सिंह, सतीश पांडे, संतोष निखार, शाम कडु, सैय्यद वाहिद, श्याम गोरले, योगेश गुप्ता, अश्वीन पिल्लेवान यांनी पार पाडली.नेहमीच चर्चेत होत्या गर्लफ्रेंडसुमितची गर्लफ्रेंड नेहमीच चर्चेत राहिली आहे. पूर्वी बजेरीयाच्या एका तरुणीसोबत त्याची मैत्री होती. त्यानंतर एका दुसºया तरुणीसोबत त्याची मैत्री होती. ही तरुणी बजाजनगरात राहत होती. यावेळी घर मालकाला फ्लॅट खाली करून घेण्यासाठी खूप धडपड करावी लागली होती.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक