शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नागपूरच्या ग्रीनबस गुपचूप बंगळुरुला नेल्या ! परिवहन विभाग अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:02 AM

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ग्रीन बसचे संचालन आता नागपुरात होण्याची शक्यता दिसत नाही. एमआयडीसी येथील डेपोत उभ्या असलेल्या ३० पैकी २९ ग्रीन बसेस स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने बंगळुरु येथील कारखान्यात परत नेल्या आहेत. याची माहिती महापालिकेच्या परिवहन विभागाला नव्हती.सोमवारी रात्री उशिरा परिवहन समितीचे सभापती बंटी कुक डे यांना बसेस नेत असल्याची माहिती मिळाली. ते एमआयडीसी येथील डेपोत पोहचले. परंतु येथे अखेरची एक ग्रीन बस नेण्याची तयारी सुरू होती. त्यांनी या बसची चावी ताब्यात घेण्याचे निर्देश परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले व याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांना दिली. मंगळवारी सकाळी ग्रीन बसेस बंगळुरुला नेल्याची वार्ता पसरताच प्रशासनात खळबळ उडाली.

ठळक मुद्देपुन्हा धावण्याची शक्यता मावळली : स्कॅनियाच्या अधिकाऱ्यांनी ट्रेलरवर लादून बसेस नेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ग्रीन बसचे संचालन आता नागपुरात होण्याची शक्यता दिसत नाही. एमआयडीसी येथील डेपोत उभ्या असलेल्या ३० पैकी २९ ग्रीन बसेस स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने बंगळुरु येथील कारखान्यात परत नेल्या आहेत. याची माहिती महापालिकेच्या परिवहन विभागाला नव्हती.सोमवारी रात्री उशिरा परिवहन समितीचे सभापती बंटी कुक डे यांना बसेस नेत असल्याची माहिती मिळाली. ते एमआयडीसी येथील डेपोत पोहचले. परंतु येथे अखेरची एक ग्रीन बस नेण्याची तयारी सुरू होती. त्यांनी या बसची चावी ताब्यात घेण्याचे निर्देश परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले व याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांना दिली. मंगळवारी सकाळी ग्रीन बसेस बंगळुरुला नेल्याची वार्ता पसरताच प्रशासनात खळबळ उडाली.विशेष म्हणजे ग्रीन बसचे आरसी बुक मनपाच्या नावाने नाही. एमआयडीसी येथील डेपोची जागा मनपाची आहे. परंतु मनपा केवळ प्रति किलोमीटर संचालनानुसार स्कॅनिया कंपनीला मोबदला देत होती. इथेनॉलवर धावणाऱ्या ग्रीन बसचे प्रति किलोमीटर भाडे ८९ रुपये होते. सूत्रांच्या माहितीनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात कुणालाही माहिती न देता ट्रेलरवर लादून ग्रीन बसेस बंगळुरुला नेण्यास सुरूवात झाली. सोमवारी रात्री बंटी कुकडे यांना माहिती मिळाली. परंतु याला उशीर झाला होता. ग्रीन बसेस नेल्याने सत्तापक्षात खळबळ उडाली. करारातील तरतुदीनुसार स्कॅनिया कंपनीच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याची तयारी सुरू आहे.दहा महिन्यापूर्वीच ग्रीन बसला ब्रेकजीएसटीच्या आधारे प्रति किलोमीटर भाडे द्यावे, सुसज्ज डेपो व एस्क्रो खाते उघडण्याच्या मुद्यावरुन स्कॅनिया कंपनीने नोटीस बजावली होती. त्यानंतर १२ ऑगस्ट २०१८ पासून ग्रीन बसचे संचालन बंद केले. ग्रीन बस पुन्हा सुरू व्हावी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर व दिल्ली येथे स्कॅनिया कंपनीचे प्रतिनिधी व मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. रेड बस ऑपरेटर ट्रॅव्हल टाइम मार्फत ग्रीन बस चालविण्याचा पर्याय सुचविण्यात आला. परंतु स्कॅनिया कंपनी बसेस चालविण्यास इच्छूक नव्हती.स्कॅनियाची न्यायालयात धावस्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने दोन मुद्यावरून महापालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. पहिल्या प्रकरणात ७.५०कोटींची बँक वॉरंटी परत मिळावी न्यायालयात तर दुसऱ्या प्रकरणात कंत्राट रद्द व्हावा,यासाठी लवादाकडे धाव घेतली आहे. लवादाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान बसेस नेल्याने मनपा प्रशासन नाराज आहे. आता करारातील अटी व शर्तींचा भंग केल्यासंदर्भात न्यायालयात जाण्याच्या विचारात आहे.स्कॅनियाची बस चालविण्यास इच्छुक नाहीस्कॅनिया कंपनीने बंगळुरू येथील कारखान्यातील ग्रीन बसची निर्मिती बंद केली आहे. नागपुरात ५५ बसेस चालवावयाच्या होत्या. परंतु २५ बसेस सुरू होत्या. तीन डेपोत उभ्या होत्या, तर दोन बसची आरसी बाकी होती. स्कॅनियाच्या मागण्या मान्य करण्याची मनपाची तयारी होती. परंतु कंपनीची बसेस चालविण्याची इच्छा नव्हती. गोवा व ठाणे शहरातील बसेस कंपनीने आधीच बंद केल्या आहेत. असे असले तरी ग्रीन बस चालविण्याचा मनपाचा प्रयत्न असल्याची माहिती बंटी कुकडे यांनी दिली.फौजदारी गुन्हा दाखल करणारस्कॅनिया कंपनीने करारातील अटी व शर्तींचा भंग केला आहे. याबाबतचा अहवाल तयार करून कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. शहरातील सार्वजनिक वाहतूक विस्कळीत केल्याच्या मुद्यावरून स्कॅनिया कंपनीच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विचार आहे. याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून निर्णय घेणार असल्याची माहिती परिवहन विभागाचे व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक